शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हेमाडपंती मंदिर पाण्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:28 IST

उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने पळसदेव येथील हेमाडपंती मंदिरांचे दर्शन होऊ लागले आहे.

न्हावी : उजनी धरणातील पाणी कमी झाल्याने पळसदेव येथील हेमाडपंती मंदिरांचे दर्शन होऊ लागले आहे. पळसदेव गावच्या वैभवात भर घालणाऱ्या प्राचीन हेमाडपंती दगडी मंदिराची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी उजनी धरण भरल्यानंतर पाण्याखाली जाणारे हे मंदिर उन्हाळ्यात पूर्णपणे उघडे पडते.या मंदिराच्या दगडांवर विविध प्रकारची शिल्पे साकारण्यात आली असल्याने मंदिर आकर्षक वाटते. रामायमाची माहिती सांगणारी ही शिल्पे असल्याने, पुरातन काळातील हा दुर्मिळ ठेवा जतन करण्याची गरज असल्याचे जाणकारातून बोलले जाते. भीमा नदीतीरावर वसलेल्या पळसदेव गावाचे सन १९७६मध्ये उजनी धरणामुळे पुनर्वसन झाले. नदीच्या काठावरील या गावाचा प्रमुख व्यवसाय शेती होता. धरण बांधणीनंतर ग्रामस्थांचे गावालगतच्या टेकडीवर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन झाले खरे, मात्र ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, घरे, मंदिरे आहे त्या स्थितीत सोडून दिले. केवळ ग्रामदैवत पळसनाथाच्या मंदिराचे स्थलांतर करण्यात आले.जुन्या मंदिरातील महादेवाची पिंड नवीन मंदिरात स्थापन करण्यात आली. तर हे जुने दगडी मंदिर मात्र आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले. गेल्या साडेतीन शतकांचा कालावधी उलटला तरी मंदिराने आपले अस्तित्व टिकवले आहे. काही ठिकाणी मंदिराची पडझड झाली आहे. अनेक दुर्मिळ शिल्पे खाली पडलेली आहेत. काही शिल्पांचे तुकडे झाले आहेत. तुकडे झालेले शिल्प (दगड) येथील नागरिक घरे बांधण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर भरुन नेताना दिसत होते. प्राचीन काळातील स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचा दाखला देणाºया या मंदिराचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या माध्यमातून हा प्राचीन वारसा जपण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तसेच त्याचे पावित्र्य जपण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.