शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

योजनांसाठी हवेली तहसीलमध्ये हेलपाटे

By admin | Updated: February 8, 2016 01:57 IST

हवेली तहसीलवरील अतिरिक्त ताणामुळे व दूर अंतर असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले

पिंपरी : हवेली तहसीलवरील अतिरिक्त ताणामुळे व दूर अंतर असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, स्वतंत्र तहसीलदार कार्यालय सुरू होऊनही विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशांना अद्यापही हवेली तहसीलदार कार्यालय पुणे येथे चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे रहिवासी विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनांची कामे पिंपरी-चिंचवड कार्यालयातून न होता हवेली तहसील कार्यालयातून होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अर्ज भरण्यासाठी पुण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. वृद्ध वनिराधार नागरिकांसाठी, विधवा, परित्यक्त्या यांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु, कार्यालय दूर असल्याने नागरिकांना त्यांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत. संजय गांधी योजनेचे काम पिंपरी तहसील कार्यालयात सुरू होण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. परंतु एकही लोकप्रतिनिधी याबाबत गंंभीर नसल्याने याचा थेट फटका सर्वसामान्य गरजू नागरिकांना बसत आहे. हवेली तालुक्यातील तहसील कार्यालयातील कामाचा भार कमी करण्यासाठी व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या नागरीकरणामुळे हवेली कार्यालयाचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय आकुर्डीत सुरू करण्यात आले आहे. केवळ अर्ज भरण्यासाठी दूर जावे लागत असल्याने अनेक नागरिक योजनेचे निकष पूर्ण करत असतानाही लाभापासून वंचित राहत आहेत. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी याबाबतप्रशासनाकडे कोणताही पाठपुरावा करताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)