शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती रुग्णांना मिळणार साह्य

By admin | Updated: February 16, 2017 03:20 IST

रुग्णांना घरी वैद्यकीय सेवा मिळावी आणि गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी,

पुणे : रुग्णांना घरी वैद्यकीय सेवा मिळावी आणि गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संचेती हेल्थकेअर अ‍ॅकॅडमी, संचेती हॉस्पिटल, गॅलट्री मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने ‘घरगुती आरोग्य सहायक’ हा अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केला जात असल्याचे घोषणा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बुधवारी केली.घरी एकट्या राहणाऱ्या वृद्ध व अपंग रुग्णांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे संचेती रुग्णालयाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा प्रतिभाताई पाटील यांनी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार संचेती रुग्णालयातर्फे येत्या १ मे पासून सहा महिने कालावधीचा ‘घरगुती आरोग्य सहायक’ हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. संचेती हॉस्पिटलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिभाताई पाटील यांनी अभ्यासक्रम सुरू करण्यामागची भूमिका सांगितली. याप्रसंगी डॉ. के. एच. संचेती, शामला देसाई, मनीषा संघवी आदी उपस्थित होते.डॉ. संचेती म्हणाले, इयत्ता ८ वी ते १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि आजारी, अपंग व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असलेल्या मुला-मुलींना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाईल. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा १७ वर्षे व कमाल ३० वर्षे असावी. प्रथम येणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एका महिन्याला प्रत्येकी १ हजार रुपये असे पूर्ण अभ्यासक्रमासाठी ६ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संचेती हेल्थकेअर अ‍ॅकॅडमीतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. मुलगा व सून दोघेही नोकरी करतात. त्यामुळे घरी आजारी असलेल्या ज्येष्ठ आई-वडिलांची किंवा लहान मुलांनाची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय माहिती असणाऱ्या व्यक्तीची गरज असते. सर्वांगीण विचार करून रुग्णालयातर्फे हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गरजूंना रोजगार आणि रुग्णांना काळजी घेणारे कुशल व्यक्ती मिळतील, असेही संचेती म्हणाले.