शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मदत करणे ही संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:32 IST

मदत करणे ही आपली संस्कृती आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यामध्ये पुणे नेहमी अग्रेसर असते, असे मत ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सोमवारी व्यक्त केले.

बिबवेवाडी : मदत करणे ही आपली संस्कृती आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यामध्ये पुणे नेहमी अग्रेसर असते, असे मत ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सोमवारी व्यक्त केले.स्वारगेट परिसरातील दादावाडी जैन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुजरात व राजस्थान येथे आलेल्या भंयकर पुरामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे प्राण गेले आहेत. पुणे पांजरपोळ गोशाळेच्या राजस्थान येथील शिरोही जिल्ह्यातील पथमेडा येथील एक लाखांहून अधिक गायी असलेल्या गोशाळेला ५५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दर्डा यांच्या हस्ते सुपूर्द केला. उद्योगपती ओमप्रकाश रांका, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन, राजेश सांकला, नगरसेवक प्रवीण चोरबेले, पांजरपोळ संस्थेचे अध्यक्ष श्रीधर पित्ती, पृथ्वीराज बोथरा, अचल जैन, संदीप संघवी, वास्तुपाल रांका, अभय बोथरा, भवरलाल जैन, सतीश शहा, शरद शहा, अनिल गेलडा, उमंग पित्ती, शांतीलाल कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.दर्डा म्हणाले, ‘‘कोणत्याही सामाजिक कार्यात सर्व सामाजिक संस्थांच्या सोबत लोकमत समूह कायम उभा आहे. ‘लोकमत’ म्हणजेच लोकशक्ती आपल्या सोबत आहे. भगवान महावीरांचा जीवदया हा सिद्धांत आहे. त्याचे अनुकरण करत पांजरपोळ संस्थेने केलेली मदत पुण्याची मान उंचावणारी आहे.राजेश साकला म्हणाले, ‘‘पांजरपोळ संस्थेने केलेली मदत म्हणजे एका गाईने दुसºया गाईला केलेली मदत आहे. यापासून प्रेरणा घेऊन पुण्यातील विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे.ओमप्रकाश रांका म्हणाले, पुणे पांजरपोळ ट्रस्टची स्थापना १८५५ मध्ये झाली होती. या संस्थेमध्ये दीड हजार गाई आहेत. कत्तलीसाठी नेलेल्या गाई सोडवून पांजरपोळमध्ये ठेवल्या जातात. ही देशातील उत्तम गोशाळा असून येथे गार्इंची उत्तम प्रकारे देखभाल घेतली जाते. गाई सांभाळणे अवघड आहे. मात्र तिचे संस्कृतीमधील महत्त्व लक्षात घेता, हे कर्तव्य प्रत्येकाने केले पाहिजे.