स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून समारंभाला फाटा देत समाजातील गरीब, गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. कोरोना महामारीमध्ये अनेक व्यक्ती मरण पावल्या. ज्या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे, अशा कुटुंबातील तरुण कर्ता पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहते. घरातील मुलांचे संगोपन, शिक्षणाची जबाबदारी त्या महिलेवर, पुरुषावर येऊन पडते. समाजातील हे चित्र पाहून प्रभाकर बांगर यांनी आजपर्यंत वाढदिवस साजरा न करता नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यावर्षी देखील त्यांनी अशा गरजू कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी पाच हजारांपासून दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली आहे. केवळ कोरोना या आजाराने नाहीतर अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंबांनादेखील मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. अवसरी खुर्द, वडगाव काशिंबेग, गावडेवाडी, पारगाव तर्फे खेड या गावातील कुटुंबांना त्यांनी रोख स्वरूपात आर्थिक मदत केली आहे. प्रभाकर बांगर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.
कोरोनामुळे कर्तापुरुष गेलेल्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST