लोणी काळभोर : जम्मू-काश्मीरमधील पम्पोर येथे देशाचे रक्षण करीत असताना अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले हवेली तालुक्यांतील फुरसुंगी येथील शहीद सौरभ नंदकुमार फराटे यांच्या कुटुंबीयांना ओम एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संकुलाच्या वतीने चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला आहे.या चार लाखांपैकी दोन लाख रुपये हडपसर येथील ओम शिक्षण संस्थेच्या मिकी मिनी शाळेच्या वतीने व लोणी काळभोर व उरुळीकांचन येथील एंजल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने दोन लाख असा एकूण चार लाखांचा धनादेश एंजल हायस्कूल लोणी येथे शहीद फराटे यांचे वडील नंदकुमार फराटे, माता मंगल व बंधू रोहित फराटे यांच्याकडे बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.(वार्ताहर)
फराटे कुटुंबीयांना मदतीचा धनादेश
By admin | Updated: January 25, 2017 01:30 IST