शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू

By admin | Updated: November 7, 2014 23:59 IST

कायमच वादग्रस्त ठरलेल्या ‘हेल्मेट’ कारवाईला वाहतूक पोलिसांनी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. शु

पुणे : कायमच वादग्रस्त ठरलेल्या ‘हेल्मेट’ कारवाईला वाहतूक पोलिसांनी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल तीन हजार ९३१ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच विविध चौकांमध्ये आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर हेल्मेट कारवाईला सुरुवात केली होती. नागरिकांना वाहतूक पोलिसांकडून अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे भांबावल्यासारखे झाले. दिवसभरात हेल्मेट कारवाईबरोबरच झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या राहिलेल्या एक हजार २१८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. दिवसभरात केलेल्या हेल्मेट कारवाईमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांकडून ३ लाख ९३ हजारांचा दंड वसूल केला. तर झेब्रा क्रॉसिंग कारवाईत १ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.हेल्मेट कारवाई यापुढेही जोरात सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमा राबवून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दणका दिला आहे. परंतु, पुणेकरांच्या दृष्टीने वादाचे मूळ असलेल्या हेल्मेट सक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली हेल्मेटची विशेष मोहीम हे हेल्मेट सक्तीचेच छोटे रूप असल्याची टीका वाहनचालकांकडून होऊ लागली आहे. पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती राबवण्याचा याआधीही अनेक पोलीस आयुक्तांनी प्रयत्न केला आहे. हेल्मेट सक्ती राबवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी पुणेकरांनी, तसेच विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलनांद्वारे ही सक्ती मागे घ्यायला भाग पाडले होते. शुक्रवारी तब्बल चार हजार जणांवर कारवाई झाल्यामुळे यापुढील दिवसांमध्ये कारवाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.(प्रतिनिधी)