शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील घाटमाथ्याला अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : इतके दिवस कोकणात धुवांधार पडत असलेल्या पावसाने कालपासून सह्याद्री पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : इतके दिवस कोकणात धुवांधार पडत असलेल्या पावसाने कालपासून सह्याद्री पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार आगमन केले. खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. ताम्हिणी, लोणावळा, वळवण परिसरात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. पुढील २४ तासात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ४.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे या हंगामातील सर्वाधिक ३९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दावडी ४७०, डुंगरवाडी ४१० मिमी पाऊस पडला होता. शिरगाव ३७०, लोणावळा, वळवण, भिरा ३४०, अम्बोणे, कोयना (पोफळी) ३२०, खोपोली ३१० मिमी पावसाची सकाळपर्यंत नोंद झाली होती.

शहर व जिल्ह्यात बुधवारी (दि २१) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. ग्रामीण भागात जोरदार झालेल्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले. आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृष्य पावसामुळे पोखरी घाटात दरड कोसळल्याने भिमाशंकर रस्ता बंद झाला होता. अनेक ठिकाणी बंधारे फुटल्याने भातशेतीचे नुकसान झाले. भोर तालुक्यात जवळपास सात ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे भोर-महाड रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक महत्वाचे रस्ते हे पाण्याखाली गेले होते. खेड तालुक्यातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील नद्यांना पुर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी तालुक्यास्तरिय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चौकट

घाटमाध्यावर अतिवृष्टीचा इशारा

पुणे शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ५.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाषाण ११.४, लोहगाव ६.२ मिमी पाऊस झाला आहे. खडकवासला परिसरात २०, वारजे १७.८, कोथरुड ६ तर लोणी काळभोर येथे ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहर व परिसरात उद्या दिवसभरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.