शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

पुण्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 04:46 IST

पुण्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पहाटेपासूनच सुरू झालेल्या धो-धो पावसाने पुणेकरांची सकाळ पाऊसमय केली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे शहरात २०

पुणे : पुण्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पहाटेपासूनच सुरू झालेल्या धो-धो पावसाने पुणेकरांची सकाळ पाऊसमय केली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे शहरात २० ते २५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. पावसाच्या काही क्षणांतच रस्त्यांवर पावसाची छोटी-छोटी तळी साचली होती. या हंगामात पहिल्यांदाच पुणेकरांनी दिवसभर बरसणाऱ्या पावसाचा अनुभव घेतला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४० मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली.शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरत कोसळायला सुरुवात केली होती. त्यामुळे पुणेकरांची सकाळच कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत सुरू झाली. जोरदार पावसामुळे काही क्षणांतच रस्त्याला ओढ्यांचे स्वरूप आले. पावसाने जोर धरल्यानंतर रस्त्यावरचे काही दिसत नव्हते. बहुतेक रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी पावसाळी गटारे तुंबली. त्यामुळे दुचाकी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. काही ठिकाणी, छोट्या छोट्या खड्ड्यात पाणी साचून राहिले. सकाळी पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे काही जणांनी पावसाचा जोर ओसरल्यावर आॅफिससाठी बाहेर पडण्याचे ठरविले. मात्र, पाऊस थांबतच नसल्याचे चित्र पाहून आॅफिससाठी घरातून पाय काढला. तर काही जण पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून वेळेच्या आधीच घरातून निघाले. सकाळी शाळा-आॅफिसची लगबगीची वेळ असल्याने त्या वेळेला रस्त्यावर वाहतूककोंडी झाली, तर काही ठिकाणी वाहतुकीचा वेगही मंदावला. प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक गर्दी झाली. येत्या २ दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. येत्या शनिवारी व रविवारीही पाऊस पडणार असण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. (प्रतिनिधी)