शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत जलपर्णीचे ढीग

By admin | Updated: August 27, 2014 05:15 IST

उजनी धरणातील पाणी प्रदूषणाची मगरमिठी अधिकच गडद बनत चालेली आहे. एरवी धरणात केवळ हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहावयास मिळते

लोणी देवकर : उजनी धरणातील पाणी प्रदूषणाची मगरमिठी अधिकच गडद बनत चालेली आहे. एरवी धरणात केवळ हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहावयास मिळते. परंतु, सध्या पुणे परिसरातून वाहत आलेल्या जलपर्णीचे ढीगच्या ढीग वाहत येत आहेत. किनाऱ्यावर जलपर्णीचे थर साठल्याने पाण्याचा उग्र वास येत आहे.प्रदूषणाचे गंभीर परिणाम उजनी धरणकाठच्या नागरिकांप्रमाणेच जैवविविधतेवर होत आहे. संपूर्ण पर्यावरणाच्या साखळीवर याचा विपरित परिणाम होत आहे.एकेकाळी उजनी धरण म्हणजे गोड्या पाण्याचे सर्वांत मोठे सरोवर म्हणून ज्याची ख्याती होती. आज ते धरण सर्वांत मोठ्या दूषित पाण्याचा साठा बनला आहे. पुणे व परिसरात असणाऱ्या विविध रासायनिक कंपन्या, साखर कारखाने व औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता हे पाणी पावसाळ्याच्या दिवसांत ओढ्यात सोडून दिल्याने आणि पुढे पावसाच्या पाण्यात वाहत जाऊन धरणात मिसळल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. सध्या पाण्यावर गडद हिरवट रंगाचा थर चढला आहे. पाण्याची दुर्गंधी वाढलेली आहे. डिकसळ व कुंभारगाव परिसरात घडलेले मिथेन वायूूचे स्फोट हे त्याचे ताजे पुरावे आहेत. सध्या पुणे परिसरातून वाहत येणाऱ्या पाण्यासोबत विविध प्रकारचे कागद, घनकचरा, प्लॅस्टिक दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या मोठ्या संख्येने जलपर्णी वाहत येत आहे. त्या पाण्यामुळे मासेमारी करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या मच्छीमारांंना व शेतकऱ्यांच्या पायाला खाज सुटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.यासंदर्भात उजनी प्रदूषण बचाव अभियानाचे अनिल खोत, पोपट नगरे, संजय शेलार, रामदास बांडे, आबा काटे, आनंद एकाड, अकबर सय्यद आदींच्या शिष्टमंडळाने पाण्यातून वाहत आलेली जलपर्णी पाहून चिंता व्यक्त केली. (वार्ताहर)