शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

उष्णतेने १०० ट्रक बटाटा वाण सडले

By admin | Updated: October 22, 2015 23:49 IST

रब्बी हंगामातील बटाटा वाणाला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत फारशी मागणी नाही. शिवाय तीव्र उष्णतेने बटाटा वाण सडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १०० ट्रक

मंचर : रब्बी हंगामातील बटाटा वाणाला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत फारशी मागणी नाही. शिवाय तीव्र उष्णतेने बटाटा वाण सडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १०० ट्रक बटाटा वाण सडून गेल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजार समितीच्या आवारात महिला बटाटा वाण निवडण्याचे काम करत असल्याचे चित्र जागोजागी दिसत होते.मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बटाटा वाण विक्रीसाठी उपलब्ध असते. सुरुवातीस पावसाने ओढ दिली. परतीचा पाऊस दमदार पडला. मात्र त्यानंतर बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. परिणामी बाजार समितीतील बटाटा वाणाला अपेक्षित मागणी नाही. रब्बी हंगामासाठी आतापर्यंत बाजार समितीत ६५० ट्रक बटाटा वाणाची आवक झाली आहे. अशी माहिती व्यापारी संजय मोरे यांनी दिली. त्यातील सुमारे १०० ट्रक बटाटा वाण सडला आहे. या वाणाची महिला निवड करतानाचे चित्र बाजार समितीत दिसत होते. पंजाब ते मंचर असे अंतर ट्रकमधून कापत असताना बटाटा वाण उन्हात तापते. हा माल बाजार समितीत येऊन पडल्यावर ग्राहक नसल्याने पुन्हा तापले जाते. परिणामी बटाटा वाण सडत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. व्यापाऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे. बटाटा वाणाला क्विंटलला १२०० ते १५०० रुपये असा भाव असून, मागील वर्षी हाच भाव ४००० वर होता. बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा लागवड करत नसल्याचे दिसते. (वार्ताहर)