शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

‘फिट’ असल्याचे वाटले तरी येऊ शकतो ह्रद्याला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या ह्रद्याला झटका आल्याच्या बातमीने अनेकांच्या ह्रद्याचा ठोका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या ह्रद्याला झटका आल्याच्या बातमीने अनेकांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला. वयाची पन्नाशीही न गाठलेल्या, नियमित व्यायाम करणाऱ्या आणि अजिबातच लठ्ठ नसलेल्या तंदुरूस्त दिसणाऱ्या सौरव गांगुलीसारख्या आहार-आरोग्याचे सर्व निकष पाळणाऱ्या व्यक्तींनाही ह्रदयविकार होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर कौटुंबिक गुणसुत्रांची पार्श्वभूमी, ताणतणाव, रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीचे आकुंचन अशा विविध कारणांमुळे ‘फिट’ दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही ह्रदयविकाराचा धोका उदभवतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, उच्च रक्तदाब अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच ह्रदयविकाराचा धोका वाढतो. मात्र, खेळाडू, नियमित व्यायाम करणाऱ्या, सकस आहार घेणाऱ्या व्यक्तींनाही ह्रदयविकार होण्यामागे मोठी पार्श्वभूमी असते. त्यासाठी नियमित चाचण्या हा एकमेव पर्याय असल्याकडे ह्रदयरोग तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले की, ह्रदयविकाराची कारणे घातक घटकांवर अर्थात ‘रिस्क फॅक्टर्स’वर अवलंबून असतात. गुणसुत्रे आणि जीवनशैलीच्या एकत्रीकरणामुळे किंवा संघर्षामुळे ह्रदयविकाराचा धोका निर्माण होतो. गुणसुत्रे हा बदलता न येणारा घटक आहे. मात्र, जीवनशैली योग्य ठेवणे आपल्या हातात असते. कौटुंबिक गुणसुत्रांची पार्श्वभूमी यात महत्वाची ठरते. ह्रदयविकार अचानक होत नाही. त्याची पार्श्वभूमी अनेक वर्षांपासून तयार होत असते. म्हणूनच आपल्या शरीरातील घातक घटक जाणून घेण्यासाठी कार्डिओग्राम, २-डी एको, स्ट्रेस टेस्ट अशा तपासण्या नियमितपणे करुन घ्यायला हव्यात. मी खेळतो, टेकडी चढतो, वजन उचलतो म्हणजे मला ह्रदयविकार होणारच नाही, हा समज चुकीचा आहे. मेदघटकांचा असमतोल, धुम्रपान, मानसिक तणाव, कोलेस्टेरॉलचे प्रमाण अशा अनेक घटकांमुळे ह्रदयविकार बळावतो.

चौकट

“ह्रदयरोग बळावण्याची काही कारणे बदलता न येण्याजोगी असतात. यात वय, लिंग, तणाव, अनुवांशिकता (फॅमिलिअर हायपरलिपिडिमिया) असे घटक कारणीभूत ठरतात. वयाच्या तिशीपासून ह्रदयविकाराशी संबंधित चाचण्या करुन घेणे क्रमप्राप्त असते.”

- डॉ. जगदीश हिरेमठ, ह्रदयरोगतज्ज्ञ

चौकट

“व्यायाम करताना ह्रदयाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे, ह्रदयाचे ठोके अनियमित होणे, मुख्य रक्तवाहिनी आकुंचन पावणे अशा अनेक कारणांमुळे तंदुरूस्त व्यक्तीलाही ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. लहानपणापासून निदान न झालेले आजारही यास कारणीभूत असू शकतात.”

- डॉ. रणजित जगताप, ह्रदयरोगतज्ज्ञ