शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचावी

By admin | Updated: June 16, 2016 04:00 IST

एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा

पुणे : एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा देश गुलाम झाला, म्हणूनच आपण जे ज्ञान मिळविले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यसेवा एका विशिष्ठ वर्गापुरती मर्यादित राहिली तर सुदृढ भारताची संकल्पना साकारणे शक्य नाही, याकडे लक्ष वेधले. गॅलँक्सी केअर हॉस्पीटलच्या उदघाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब मुजुमदार तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे तसेच केअर हॉस्पीटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संंचालक डॉ. बी. सोमा राजू, उपाध्यक्ष डॉ. एन कृष्णा रेड्डी आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘आज हेल्थकेअरचा लँंडस्केप बदलतोय, पूर्वी डॉक्टरांची वानवा होती, पण आता परिस्थिती बदलली आहे, तंत्रज्ञानावर आधारित हेल्थकेअर सर्वत्र पहायला मिळत आहे. थ्रीडी इमेजनरी आॅपरेशन्स, रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केल्या जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. आरोग्यसेवा ही सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिली पाहिजे. शासनाने विम्यावर आधारित महात्मा फुले जन आरोग्य सेवा आणली आहे. डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, ‘‘२००५ मध्ये हे गॅलेक्सी हॉस्पीटल सुरू केले. लॅप्रॉस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करणारे तंत्र विकसित केले ज्या तंत्राला पुण्याचे नाव दिले गेले. जगभरात ‘पुणे टेक्निक’ या नावाने ते ओळखले जाते. बारा ते तेरा डॉक्टरांना ते शिकविले गेले आहे, ज्याचा विविध देशांमध्ये वापर केला जात आहे. रोबोटिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करणारे हे देशातील पहिले रूग्णालय आहे.’’ पूर्वी विद्यार्थ्याला ६० ते ७० टक्के गुण पडले तरी पेढे वाटले जायचे, आज मात्र मार्कांचे अवमूल्यन किती व्हावे याला देखील मर्यादा असल्या पाहिजेत. कुठेतरी चुकतयं. ८० टक्याची मुलगी आत्महत्या करीत आहे, हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणपद्धतीत बदल व्हायला पाहिजे.- डॉ. शां. ब. मुजुमदार