शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पावसात कचरा भिजू लागल्याने आरोग्याचा प्रश्न

By admin | Updated: June 22, 2015 04:34 IST

शहरामध्ये ठिकठिकाणी साठलेला कचरा पावसामुळे भिजू लागल्याने तो सडण्यास सुरुवात झाली आहे. कचऱ्याचा चिखल तयार होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी

पुणे : शहरामध्ये ठिकठिकाणी साठलेला कचरा पावसामुळे भिजू लागल्याने तो सडण्यास सुरुवात झाली आहे. कचऱ्याचा चिखल तयार होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट पूर्ण क्षमतेने कशी लावायची हा बिकट प्रश्न पालिकेला सोडवावा लागणार आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून कचरा टाकण्याची अट ग्रामस्थांनी टाकली आहे. कचरा भिजू लागल्याने अडचणी निर्माण होत आहेत. शहरामध्ये दररोज तेराशे ते चौदाशे टन कचरा तयार होतो, त्यापैकी पाचशे टन कचरा डेपोमध्ये टाकला जात आहे. साडेतीनशे ते चारशे टन कचरा शेतकरी खतासाठी घेत होते. तसेच उर्वरित कचरा बायोगॅस व इतर प्रकल्पांसाठी पाठविला जातो. पावसामुळे शेतकऱ्यांकडून कचरा घेतला जाणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या कचऱ्याचा जटिल प्रश्न पुन्हा उभा राहणार आहे. शहरातील मध्यवस्तीसह उपनगरांमधील अनेक ठिकाणी कचरा उचलला गेला होता, त्यातच रविवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कचरा भिजून सगळीकडे पसरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात कचरा साठल्याने अचानक चिलटांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. पावसामुळे कचरा सडल्यास त्यातून आरोग्याचे आणखी गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.