शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे पैलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST

पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी असून चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित ...

पुणे : उत्तम आरोग्य ही चांगल्या जीवनाची पहिली पायरी असून चांगल्या शिक्षणामुळेच माणसाला आरोग्यभान येते. कोरोनाच्या संकटाने हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण हेच जीवनाचे महत्त्वाचे पैलू आहेत, असे मत राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात टोपे बोलत होते. त्यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, प्र-कुलगुरू व राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

कोरोना संकटातील भारती हॉस्पिटलचे कार्य उल्लेखनीय आहे, असे नमूद करून राजेश टोपे म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाला.

डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, उच्च शिक्षणाचा विस्तार होत असताना गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. चांगल्या शिक्षकांचा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गुणवत्ता वाढीसाठी करणे गरजेचे आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, विद्यापीठात संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राध्यापकांमध्ये ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती असायला हवी.

डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, शिक्षण क्षेत्रात प्रगतीची झेप घेताना भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च प्राधान्य दिले.

प्रा. मिलिंद जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.