शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मुख्याध्यापक लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: March 22, 2017 03:18 IST

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाच्या कारवाईत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी

पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाच्या कारवाईत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे व क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांना मंगळवारी लाचेची मागणी करताना जाळ्यात सापडले. त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरीतील उद्यमनगर येथे महापालिकेची क्रीडा प्रबोधिनी शाळा आहे. विद्यार्थी खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. क्रीडा शिबिरातील खेळाडूंना अल्पोपाहार पुरविण्याचे काम दिलेल्या कॅन्टीन ठेकेदारास बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी केली. अनुकूल अहवाल आणि बिल मंजुरीसाठी १४ मार्च २०१७ ला त्यांनी २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली होती. त्यातील पाच हजार रुपये मुख्याध्यापकांसाठी, उर्वरित २० हजार रुपये शिक्षणाधिकाऱ्यांसाठी मागण्यात आले होते. ठरल्यानुसार पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीकडून मंगळवारी क्रीडा प्रबोधिनी शाळेजवळ त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी, सुनील शेळके, किरण चिमटे, कारले, महिला पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.(प्रतिनिधी)