शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

बेशिस्त वाहनचालक नागरिकांची डोकेदुखी

By admin | Updated: July 7, 2017 02:58 IST

बेशिस्त वाहने, अवैध वाहनतळ, रस्त्यावर असनाऱ्या नियमबाह्य खाद्यपदार्थांच्या गाड्या यामुळे सासवड शहरात वाहतुकीचा

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : बेशिस्त वाहने, अवैध वाहनतळ, रस्त्यावर असनाऱ्या नियमबाह्य खाद्यपदार्थांच्या गाड्या यामुळे सासवड शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीत वाढ होत चालली आहे. तालुक्याचे प्रमुख ठिकाण म्हणून सासवडला तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, बेशिस्त चालक आणि वाहतूक व्यवस्थापनाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नारायणपूरला जाणाऱ्या वडाप गाड्या बाजारपेठेतून भरधाव वेगाने चालक दामटत असतात. बेदरकार वाहनचालकांमुळे वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणार तरी केव्हा, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. जेजुरी नाक्यापासून बस स्टँडपर्यंत तसेच शहरातील प्रमुख मार्गावर अस्ताव्यस्त पार्किंग असते. मुख्य बाजारपेठेतील मार्गाच्या दोन्ही बाजूस निम्म्या रस्त्यापर्यंत वाहने पार्क केलेली असतात़ परिणामी या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होते़. त्याचबरोबर काही व्यावसायिकांनी तर पदपथावरच दुकाने थाटली आहेत. यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. मुख्य महामार्गावर होत असलेले भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण कारवाईनंतर पुन्हा जैसे थे झालेले आहे. हे अतिक्रमण लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गाची पाहाणी करणे गरजेचे आहे. अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना त्यांनी त्वरित साहित्य हटविण्याबाबतसूचना द्यायला हव्यात. तसेच अस्ताव्यस्तपणे पार्किंग होत असलेल्या ठिकाणी सम-विषम पार्किंगची शिस्त लावायला हवी. म्हाडा वसाहत (सोपाननगर) कमानीपासून पालखी तळापर्यंतदेखील दोन्ही बाजुंनी वाहने उभी केल्याने वारंवार वाहतूककोंडी होत आहे. पालखी महामार्ग ते कोंढवा हा सिमेंटचा रस्ता सासवड नगरपरिषद हद्दीत नव्याने झालेला असून दुतर्फा मनाला येईल तशी अस्ताव्यस्तपणे पार्किंग होत असल्यामुळे एवढा रुंद रस्तादेखील वाहतुकीस अपुरा पडत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचेच झाले  आहे. परंतु वाहनचालकांकडून  काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने वाहतूक व्यवस्थेला अडचणी येत आहेत.अद्ययावत मंडई असली, तरी भाजीविक्रेते बसतात रस्त्यावरशहरात अद्ययावत सोयींनीयुक्त महात्मा फुले भाजी मंडई उभारलेली असतानादेखील भाजीविक्रेते पालखी महामार्गावर, तसेच अत्रे सभागृहाजवळ बसलेले असतात. त्यामुळे सोपाननगरकडे जाणाऱ्या रहिवाशांना रस्त्यावर लावलेल्या वाहनांमधूनच वाट शोधावी लागते, यात किरकोळ अपघातही झालेले आहेत.सासवड शहरात दुचाकीस्वार सैराट अल्पवयीन मुले दुचाकी त्याचबरोबर चारचाकी वाहनेही दामटताना दिसत असून त्यांच्यावर ना पालकांचे नियंत्रण आहे, ना वाहतूक पोलिसांचा धाक. शहरात पे अँड पार्कची कोणतीही सोय उपलब्ध नाही. शहरात बुलेटची क्रेझ वाढलेली असून, भरधाव वेगात कर्क्कश आवाज काढत जाणारे बुलेटस्वार चौकाचौकांत पाहायला मिळत आहेत.