शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सारखी माहेरी जाऊन सासरी येण्यास नकार दिल्याने भररस्त्यात झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकूने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सारखी माहेरी जाऊन सासरी येण्यास नकार दिल्याने भररस्त्यात झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकूने वार करून तिचा खून केला.

शुभांगी सागर लोखंडे (वय २१, रा. भेकराईनगर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. सागर बाळू लोखंडे (वय २३, रा. उरुळी देवाची मूळ रा. विजयवाडी, अकलुज) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना भेकराईनगरमधील शिवशक्तीनगर चौकात बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी रेणुका राजू हनवते (वय ३७, रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघे जण उरुळी देवाची येथे रहात होते. सागरला दारु आणि गांजाचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन शुभांगी ही वारंवार भेकराईनगर येथे माहेरी आईकडे येत असे. आताही शुभांगी ही माहेरी आली होती. तेथून ती आज सकाळी कामाला जाण्यास निघाली होती. वाटेत शिवशक्ती चौकात सागरने शुभांगीला गाठले व तिला घरी येण्यास सांगितले. त्याला शुभांगीने नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात रस्त्यातच वाद सुरु झाला. त्यावेळी सागरने शुभांगीच्या पोटात चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्याने शुभांगी जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडली. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी सागर लोखंडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.