शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चार शेळ्यांना क्रूरपणे मारले

By admin | Updated: April 25, 2016 01:53 IST

मावळ तालुक्यातील गोडुंब्रे गावात शेतकऱ्याच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्यांचे, तसेच दोन करडांचे पाय कापले, डोळे काढले अशा पद्धतीने वेगवेगळे अवयव काढून क्रूर हत्या केली.

शिरगाव : मावळ तालुक्यातील गोडुंब्रे गावात शेतकऱ्याच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्यांचे, तसेच दोन करडांचे पाय कापले, डोळे काढले अशा पद्धतीने वेगवेगळे अवयव काढून क्रूर हत्या केली. शनिवारी पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत शेळ्या तेथेच सोडून अज्ञात टोळके पसार झाले. हा प्रकार अघोरी विद्येच्या आहारी जाऊन की, सावंत कुटुंबीयांमध्ये भीती पसरविण्यासाठी केला, हे स्पष्ट न झाल्याने सावंत कुटुंबीय भयभीत झाले आहे.गोडुंब्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे संतोष सावंत यांचे घर आहे. शनिवारी पहाटेच्या तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेल्या चार शेळ्या व दोन पिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने कत्तल केली. त्यांचे डोळे, पाय कापून व अन्य अवयव कापून नेले. करडांनाही त्यांनी सोडले नाही. करडांचासुद्धा त्यांनी क्रूर पद्धतीने बळी घेतला. त्यामुळे सावंंत कुटुंबीय हादरून गेले आहे. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असता, तर शेळ्या घेऊन गेले असते. शेळ्या चोरून न नेता जागेवरच त्यांची कत्तल करून अवयव घेऊन गेल्यामुळे कर्मकांडासाठी केलेला हा अघोरी प्रकार असून, त्यासाठी हे कृत्य केले असावे, अशी चर्चा परिसरात आहे. सावंत यांनी मागील आठवड्यातच काही शेळ्या खरेदी केल्या होत्या. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी गावातील तरुणांनी गस्त सुरू केली असून, नेमका काय प्रकार आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती माजी सरपंच गणेश सावंत यांनी दिली. (वार्ताहर)