शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घातक शस्त्रे बाळगणारा अटकेत

By admin | Updated: May 31, 2017 02:45 IST

बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेकडील संघटित गुन्हेगारीविरोधी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेकडील संघटित गुन्हेगारीविरोधी पथक दक्षिण विभागातर्फे गुन्हेगारांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे असा २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक द्वारकानाथ सरोदे (वय २७, रा. ५४/५५ शनिवार पेठ,अमृतेश्वर मंदिर) व धनंजय प्रकाश काळे (रा. शिवपुष्प पार्क प्लँट नं. ३२) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. काळेविरुद्ध विश्रामबाग, खडक, दत्तवाडी पोलीस ठाणे येथे गर्दी, मारामारी, जखमी करणे, दारू पिऊन गोंधळ घालंणे व सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सीआरपीसी ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक पोलीस फौजदार राजेंद्रसिंग चौहान, शंकर जांभळे, पोलीस हवालदार गणेश साळुंके, भालचंद्र बोरकर, सुनील चिखले, प्रवीण तापकीर, दीपक भुजबळ, संजय बरकडे, पोलीस कॉ. कैलास साळुके, राकेश खुणवे, प्रवीण पडवळ, विवेक जाधव, नितीन रावळ, रमेश चौधर व चालक गंगावणे यांनी ही कामगिरी केली. संघटित गुन्हेगारीविरोधी पथक शहरात गस्त घालत असताना विनायक सरोदे याच्याकडे एक बनावटीचे पिस्तूल व राऊंड असून, तो विक्रीसाठी सिंहगड रस्त्याच्या विठ्ठलवाडी कमानीजवळ थांबलेला आहे. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे स्टीलचा चॉपर सापडला. त्याच्याकडे गावठी कट्टा व राऊंडबाबत सखोल चौकशी केली असता त्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला त्याचा मित्र धनंजय काळे याच्याकडे गावठी कट्टा व राऊंड ठेवले असल्याचे सांगितले. काळे याच्या राहत्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.