शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वडापुरी परिसरातील शेतकरी हवालदिल

By admin | Updated: April 22, 2016 01:05 IST

परिसरात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यासह जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे.

वडापुरी : परिसरात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्यासह जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे पिके हाती लागली नसल्याने जनावरांना लागणारा चारा कमी प्रमाणात निघाल्याने सध्या वडापुरी अवसरी काटी पंधारवाडी या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुसऱ्या तालुक्यातून जनावरांना चारा आणून घालण्याची वेळ शेतकरी वर्गाला आली असल्याचे पाहावयास मिळत आहे. वडापुरी परिसरासह तालुक्यात पावसाने गेली चार ते पाच वर्षे झाली. दगा दिल्यामुळे यंदा कमी प्रमाणात ज्वारी, मका, कडवळ याचे कमी प्रमाणात उत्पन्न निघाल्याने कमी प्रमाणात चारा निघाला. परंतु, निघालेला चारासुद्धा आत्ता शिल्लक राहिला नसल्याने चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे दुभत्या गाईंना जगविण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातून वाहनाने चारा आणावा लागत असल्याचे चित्र आहे. पडलेल्या भीषण दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची खोलवर गेलेली पातळी गेली आहे. सध्या जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्याने गुरांचे पोट व पाट एक झाल्याचे सध्या चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. पाच वर्षांपासून सलग पडलेल्या भीषण दुष्काळामुळे भयंकर परस्थिती निर्माण झाली आहे. जर आज ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यापर्यंत काय परिस्थिती असेल, यामुळे सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. > हाताला काम, जनावरांना चारापाणी द्यासुपे : बारामती जिरायती भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळी दौरा काढला. या वेळी गावोगावच्या ग्रामस्थांनी प्रामुख्याने वाढीव पाणी, जनावरांना चारा व पाणी तसेच हाताला काम देण्याची मागणी केली.सुपेसह जिरायती पट्ट्यातील बोरकरवाडी, वढाणे, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, नारोळी, कोळोली आणि बाबुर्डी आदी ठिकाणच्या जिरायती भागाचा दुष्काळी दौरा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, ग्रामस्थांच्या हाताला काम देण्याची मागणी तसेच जलसंधारण व ओढा खोलीकरण आदी कामांचा पाढाच ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले की, अद्याप तरी सरकारच्या माध्यमातून दुष्काळातील कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी दौरा काढण्यात आला. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती होळकर यांनी दिली. या वेळी सतीश खोमणे, करण खलाटे, विक्रम भोसले, शंकरराव चांदगुडे, दीपक मलगुडे, सतीश तावरे, दत्तात्रय कुतवळ उपस्थित होते.