शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

रस्त्यावरचा आठवडेबाजार हटेना

By admin | Updated: March 31, 2017 02:30 IST

महामार्गालगत बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे व पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी कायम आहे. पोलीस विक्रेते व वाहनांवर कारवाईचा फक्त फार्सच

कोरेगाव भीमा : येथील महामार्गालगत बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे व पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी कायम आहे. पोलीस विक्रेते व वाहनांवर कारवाईचा फक्त फार्सच करीत आहे. काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या जागेत बंद झालेला बाजार पुन्हा सुरु झाल्याने गेल्यावर्षी रस्त्यावरचा आठवडे बाजार स्तलांतरित करण्याची जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस व एसटी महामंडळ यांनी सुरु केलेली मोहीम बंद पडल्याने वाहतूककोंडी पूर्ववत झाली असल्याचे चित्र आहे. कोरेगाव भीमा येथील बाजार हटविण्यासंदर्भात गतवर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी स्थानिक ग्रामपंचायतीस सांगितले होते. मात्र ग्रामपंचायतीने बाजार एसटी महामंडळाच्या जागेतून हलवून रस्त्याच्या बाजूलाच बसविल्याने उलट वाहतूककोंडीस निमंत्रणच दिले आहे. १३ एप्रिल २०१६ रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी कोरेगाव भीमा ग्रामपंचातीस पत्र दिले होते, की बाजार स्मशानभूमीत हलवून रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर व पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार बहुतांश विक्रेते रस्त्याच्या बाजूला बसल्याने वाहतूककोंडी काहीप्रमाणात सुटली होती. मात्र त्यानंतर पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांची बदली झाल्यानंतर व जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही वाहतूक समस्येसंदर्भात बैठका बंद पडल्याने पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडीचा विषय सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी कानामागे टाकल्याने पुन्हा वाहतूककोंडीस सुरुवात झाली आहे. त्यात आता पुन्हा भाजीविक्रेते रस्त्यावरच दुकान थाटू लागले आहेत, तर पार्किंगही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच उभी केल्याने वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहे. यात भर म्हणून की काय दुकाने, फळगाड्या एसटी महामंडळाच्या जागेत पुन्हा थाटू लागल्याने वाहतूककोंडीत वाढ झाली आहे. तहसीलदार राजेंद्र पोळ यांच्याकडे आठवडे बाजार संदर्भात चौकशी केली असता त्यांनी, अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दिला असल्याचे सांगितले.तर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, गटविकास अधिकारी संजय जठार यांना आठवडे बाजार स्थलांतरासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘आठवडे बाजार स्थलांतराचा विषयच आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले, चौकशी करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)बाजार स्थलांतराची मोहीम थंडावलीकोरेगाव भीमा रस्त्यालगत असणारा आठवडे बाजार स्थलांतरित करण्याची गतवर्षी जोरदार असलेली मोहीम प्रशासनाकडून थंडावली आहे. त्यामुळे आठवडे बाजार रस्त्यावरच भरत असल्याने वाहतूककोंडीत मोठी वाढ झाली असल्याने पुणे-नगर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.एसटी महामंडळाच्या जागेत सुरू झाला पुन्हा बाजारयेथील एसटी महामंडळाच्या जागेतील आठवडे बाजार गतवर्षी तहसीलदार, पोलीस व गटविकास अधिकारी यांना हटविण्यात यश आले होते. मात्र कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा बाजार एसटी महामंडळाच्या जागेत भरू लागल्याने वाहतूक समस्येत पुन्हा वाढ झाली आहे. प्रशासनाने मात्र डोळ्यांवर पट्टी बांधली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील आठवडेबाजार हटविण्याची जबाबदारी कोणाची...?रस्त्यावरील आठवडे बाजारामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे हे, एक अधिकारी व सहा कर्मचारी गुरुवार दिवशी वाहतूक सुरळीत करण्यासाठी देत असतात. मात्र तहसीलदार, गटविकास अधिकारी हे कोणतीच कारवाई करत नसल्याने बाजार हटविण्याची जबाबदारी नक्की कोणाची? हा सवाल उपस्थित होत आहे.