शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘हर हर महादेव’चा जयघोष : ‘श्रीं’ना कऱ्हेच्या पवित्र जलधारेने जलाभिषेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 21:58 IST

चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला.

ठळक मुद्देमानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा

जेजुरी : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने बुधवारी चैत्र शुद्ध द्वादशीला ‘हर हर महादेव’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुगी घाट सर केला. पायी वारीने आणलेल्या कऱ्हेच्या पवित्र जलाने निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या हस्ते स्वयंभू ‘श्रीं’ना धार (जलाभिषेक ) घातली.

येथे शंभुमहादेवाची यात्रा दर वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. यात्रा-उत्सव काळात पंचमीला हळदी, अष्टमीला ध्वज चढविणे व रात्री शिवपार्वतीचा विवाह सोहळा. यानंतर चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला.परंपरेनुसार या यात्रेसाठी २५ मार्च रोजी रामनवमीला प्रस्थानानंतर कावड कोळविहिरे, जोगवडी, मेहता फार्म, वडगाव कॅनॉल, जिंती, फलटण, निंबळक नाका असा तीन दिवसांचा प्रवास करून २८ मार्च रोजी पहाटे रणखिळा येथे पोहोचली. येथे मानाची सवईची हालगी, गुणावरे वाटाड्याच्या कावडीचा सहभाग घेऊन कोथळेत सर्व लवाजम्यासह विसाव्यासाठी थांबली. या वेळी कावडीसोबत पायी वारीत न आलेले पंचक्रोशीतील हजारो भाविकही येथे दाखल झाले. येथे पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला.कोथळे येथे प्रशासनाच्या वतीने अनेक मान्यवरांनी स्वागत केले. या वेळी नानासाहेब तेली महाराज (इस्लामपूर) यांच्यासह लहानमोठ्या काठ्या कावडी, शिर्सुफळ, शेटफळगडे, सणसर, माळेगाव, काटेवाडी, शिवभक्त मंडळी गोडाळा, रामहरिकृष्ण व्यवहारे, दगडू चव्हाण, ढेकळेवाडी कावडींच्या भेटी झाल्या.दुपारी तीनच्या सुमारास ढोलताशा, लेझीम, वाजंत्री यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने कावडीने येथून पुढे तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुंगी घाटाच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी ५ पर्यंत कावड मुंगी घाटाच्या पायथ्याला आली. तेथे महाआरती करून शंभोच्या नावाचा महागजर झाला व भक्तिमय वातावरणात कावडीची अवघड अशी मुंगी घाटाची चढण सुरू झाली.यावेळी नभात ऊनसावलीचा खेळ, निवृत्तीमहाराज खळदकर व मागे वाजंत्र्यांच्या, डफडीच्या ठेक्यावर बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. या वेळी हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक डोंगरमाथ्यावर गर्दी करून बसले होते. येथून घाटातील माणसे अगदी मुगीसारखी दिसत असल्याचा प्रत्यय येत होता. सायंकाळी ६.४० वाजता एक-एक टप्पा पार करीत कावड घाटमाथ्यावर आली. येथे पोलीस व प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :Jejuriजेजुरी