शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जीवनशैलीने मधुमेहमुक्ती शक्य

By admin | Updated: March 5, 2016 00:35 IST

‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो

चिंचवड : ‘‘मधुमेह हा रोग नसून, अभावग्रस्त शरीराची ती एक स्थिती आहे. व्यायाम, योगोपचार, आहार- विहार, आनंददायी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने भारत मधुमेहमुक्त होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. रवी आचार्य यांनी केले.शाहूनगर, चिंचवड येथील शिवशंभो फाउंडेशनच्या शिवशंभो व्याख्यानमालेत ‘मधुमेहमुक्त भारत’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी उमा खापरे, योगेश बाबर, भगवान पठारे, लक्ष्मण टक्केकर, संजय मंगुडकर, भावेन पाठक, प्रदीप साळुंखे, संजय तोरखडे उपस्थित होते.डॉ. आचार्य म्हणाले, ‘‘जागतिक मधुमेह दिनी १९९०मध्ये भारतात चार टक्के मधुमेही रुग्ण होते; गेल्या वर्षी हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जागतिकीकरणामुळे अनेक उपभोग्य वस्तूंची रेलचेल वाढली. जीवनशैलीत खूप मोठे बदल झाले. रात्री उशिरा पिझ्झा आणि शीतपेये असा आहार तरुण पिढी घेऊ लागली. कामातील प्रचंड ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेही तरुणांचा देश अशी भारताची ओळख निर्माण होईल की काय, अशी भीती आहे. मधुमेहाची कारणमीमांसा केल्यावर अनुवंशिकता, आहारातील अनियमितता, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि जन्मजात मधुमेह ही मुख्य कारणे आढळतात. ड आणि ब-१२ जीवनसत्त्वाअभावी अशक्तपणा, थकवा जाणवतो आणि तीच मधुमेहाच्या संकटाची नांदी असते. ‘ड’ जीवनसत्त्वासाठी कोवळा सूर्यप्रकाश लाभदायक असतो. पहिल्या प्रहरी म्हणजेच पहाटे पाच ते सात दरम्यान किमान अर्धा तास पायी चालणे, १५ मिनिटे प्राणायाम, १५ मिनिटे सूर्यनमस्कार, अर्धा तास योगासने करावीत. आहाराच्या वेळा पाळाव्यात, असे ते म्हणाले. केशव घोळवे यांनी मनोगत व्यक्त केले. अजित भालेराव, राजेश हजारे, सुधीर झाडबुके, नलिनी इंगळकर, जनार्दन लोंढे, प्रकाश येवले, कैलाश पोखरकर यांनी संयोजन केले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका हजारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)