शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

झुलत्या दोरावर दिसतोय जगण्याचा संघर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 04:17 IST

पैसा कमाना, मौज मनाना, सारे जहाँ का बोज उठाना, मेहनत मेरा जीवन, मैं कुली नं. वन..मैं कुली नं. १ या गाण्याच्या सुरांनी बारामतीकर थबकले. भिगवण चौकात

- लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पैसा कमाना, मौज मनाना, सारे जहाँ का बोज उठाना, मेहनत मेरा जीवन, मैं कुली नं. वन..मैं कुली नं. १ या गाण्याच्या सुरांनी बारामतीकर थबकले. भिगवण चौकात सायंकाळी ध्वनीक्षेपकावर हे गाणे वाजत होते. झुलत्या दोरावर जगण्याचा संघर्ष सुरू होता.. अवघ्या ४ वर्षांच्या बालिकेच्या कसरती पाहताना भर रहदारीच्या चौकातील वाहतूक रेंगाळली!अजाणत्या वयातील ४ वर्षांची बालीका ७ फुट उंचीवर बांधलेल्या दोरावर कोणत्याही आधाराशिवाय कसरती करीत होती. यावेळी तिचा खेळ पाहण्यासाठी लावलेले गाणे जणू जगण्याच्या संघर्षाचीच कहाणी सांगत होता. अजाणत्या वयात ही बालीका खरोखर धोकादायक खेळ करुन तिचे आईवडील ,बहिण भावाचे पालनपोषण करीत होती. खरे तर खेळण्या बागडण्याचे, अंगणवाडीत जाण्याचे तिचे वय. मात्र, कुटुंबाचा भार उचलण्यासाठी तिने आतापासुनच जीवघेण्या कसरतींना सुरवात केल्याचे दिसत होते. कोमल कळी मी इवलीशी..आभाळाइतका ़भार वाहते..दोरीवर उभा राहुन पोटासाठी मृत्यु पाहते..या उक्तीप्रमाणे कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी चित्तथरारक कसरती करणे हेच तिचे जीवन बनले आहे. आजच्या चार वर्षीय बालीकेच्या उंचावर चाललेल्या कसरती पाहुन बारामतीकर हेलावले. या चिमुरडीच्या कसरती पाहुन अनेकजण जागेवरच थबकले. वाहतुक देखील काही काळ रेंगाळली. काहींनी तिचे मोबाईलमधुन व्हीडीओ चित्रीकरण केले, काहींनी तिचे फोटो काढले. मात्र, या बालीका केवळ कसरती करण्यात हरवुन गेली होती. तर तिचे वडील ती दोरीवर चालताना तिच्या दोरीवरील पावला बरोबर रस्त्यावरील पाऊल पुढे टाकत होते. तिच्या वडीलांना तिचे कौतुक देखील होते, काळजी देखील होती. खेळ संपल्यावर मिळेल ते पैसे घेउन हे कुुटंब पुढील खेळ करण्यासाठी निघुन गेले. हमारी जिंदगी एक सर्कसही तो है!उत्तर प्रदेशातील जयराम भाई त्यांची पत्नी दुखीन बाई यांची सुरेखाबाई ही चार वषार्ची ती मुलगी आहे. चरीताथार्साठी हे कसरतीचे खेळ ते करतात. एवढ्या सर्कस ही हमारी जिंदगी है, अब क्या करे, असे ते हताशपणे सांगतात. सिर्फ रहनेके के लीए घर है गांव में, खेती और कुछ नाही, इसके सिवा क्या करेंगे अशा शब्दात त्या बालीकेच्या आईने हतबलता व्यक्त केली.