डिंभे : जुन्नर तालुक्यातील तांबे व पेण (रायगड) येथील आदिवासी बालिकेंवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी विविध आदिवासी संघटनांकडूनांनी एकत्र येऊन तहसीलदारांकडे केली.
आंबेगाव तालुक्यातील बिरसा ब्रिगेड संघटनेकडून याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एका अडीच वर्षीय बालिकेवर एका बलात्काराच्या गुन्हातील आरोपीने अत्याचार करून निर्घृण हत्या केली. तो जामिनावर सुटलेला होता. तर दुसऱ्या घटनेत पुणे जिल्ह्यतील
तांबे तालुका, जुन्नर येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बिगर आदिवासी तीन युवकांनी बलात्कार केला व या गुन्ह्यातील दोन आरोपी सध्या पोलीस ठाण्यात आहेत. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक स्तरांतून या घटनांचा निषेध करण्यात येत आहे. या दोन्ही घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगावच्या वतीने तहसीलदार रमा जोशी व घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगावचे सचिव विकास पोटे, पुणे जिल्हा बिरसा ब्रिगेड उपाध्यक्ष मानाजी केंगले आंबेगाव तालुका मातृशक्ती प्रमुख उमाताई मते, प्रसिध्दी प्रमुख संतोष तिटकारे, आंबेगाव तालुका उपाध्यक्ष दत्ता वाघ, अशोक कोकणचे,गोविंद केंगले, रामचंद्र भोते,दुंदा घोईरत, चंद्रकांत लोहकरे दादा विठ्ठल आढारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो ०६ डिंभे
आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या. या मागणीचे निवेदन सादर करताना आदिवासी संघटनांचे पदाधिकारी.
छायाचित्र -कांताराम भवारी.