शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या हातात पुन्हा आली पाटीपेन्सिल!

By admin | Updated: January 1, 2017 04:31 IST

विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा

बारामती : ‘विद्येविना मती गेली.. मतीविना नीती गेली... नीतीविना गती गेली... गतिविना वित्त गेले... वित्ताविना शूद्र खचले... इतके अनर्थ एका अविद्येने केले...’ हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आजही लागू पडतात. येथील शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी आणि त्यांच्या शारदा निकेतनमधील शिक्षकांनी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा निरंतन वसा घेतला. मागील तीन वर्षापासून आलेल्या कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा उपक्रम या वंचित मुलांना शिक्षणाची गोडी लावणारा ठरला आहे. बारामती तालुक्यात माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती हे साखर कारखाने आहेत. दर वर्षीच्या गळीत हंगामासाठी मोठ्या प्रमाणात बीड, उस्मानाबाद, नगर आदी भागातील ऊसतोडणी कामगार मुलाबाळांसह कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होतात. काही वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने साखरशाळा सुरू केल्या. आता या साखरशाळा अभावानेच दिसत आहेत. काही ठिकाणी त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून आलेला विद्यार्थी पुढे ऊसतोडणी कामगारच होणार का, असा प्रश्न निर्माण झाला. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले पाहिजे, सर्वांना मोफत शिक्षण सक्तीचे केले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील सांगितले; परंतु अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. ऊसतोडणी कामगारांची मुले तर ऐन कडाक्याच्या थंडीत आई-वडिलांबरोबर कारखान्यांवर दाखल झालेली असतात. ‘साखरशाळा’ बंद झाल्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते ही बाब सुनंदा पवार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक संकुलातील शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्राचार्य सूर्यकांत मुंढे, समन्वयक प्रल्हाद जाधव, शिक्षक विजयसिंह घाडगे यांना शाळेपासून वंचित राहिलेल्या कामगारांच्या मुलांचा सर्व्हे थेट कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन करण्यास सांगितले. २०१४ पासून गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी आलेल्या कुटुंबांचा सर्व्हे केला जातो. त्यामुळे अर्धवट शाळा सोडून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. मोफत शिक्षण दिले जाते. कामगारांची मुले शिक्षणासाठी येण्यासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांना ने-आण करण्यासाठी गाडीची सोय केली. शाळेतील मुले, मुली या विद्यार्थ्यांना सामावून घेतात. साधारणत: चार महिने ही सोय केली जाते, असे प्राचार्य सूर्यकांत मुंढे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नव्या वर्षाचे आगळेवेगळे स्वागत...या वर्षी १४ मुलांची सोय करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना नव्या वर्षाची भेट म्हणून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कपडे, खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. ऊसतोडणी कामगारांची मुले प्रोजेक्टरसह अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे खरोखरच ‘वंचितां’च्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचा केलेला प्रयोग नव्या पिढीला दिशादर्शक आहे.