शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दस्तनोंदणीला कनेक्टिव्हिटीचा अडथळा

By admin | Updated: March 28, 2016 03:14 IST

नागरिकांच्या खास सुविधेसाठी चाकण (ता. खेड) येथे सुरू करण्यात आलेले दस्तनोंदणी रजिस्टर कार्यालय बीएसएनएलच्या कनेक्टिव्हिटीअभावी मागील तीन दिवसांपासून बंद आहे.

पुणे : नागरिकांच्या खास सुविधेसाठी चाकण (ता. खेड) येथे सुरू करण्यात आलेले दस्तनोंदणी रजिस्टर कार्यालय बीएसएनएलच्या कनेक्टिव्हिटीअभावी मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ‘कार्यालय उघडे; पण काम बंद’ अशी अवस्था या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.नागरिकांना खरेदी-विक्री, साठेखत, वाटपपत्र, गहाणखत, कुलमुखत्यारपत्र असे दस्त रजिस्टर करण्यात अडचण येत आहे. अशी सर्व कामे करण्यासाठी इंटरनेट सुविधा लागत असते. शासनाच्या या कार्यालयात बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी दिली आहे. परंतु ती वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. दस्तनोंदणीसाठी सकाळी आल्यानंतर सायंकाळी पाच-सहा वाजेपर्यंत ताटकळत बसण्याची नागरिकांवर वेळ येत आहे. अनेक वेळा तर कनेक्टिव्हिटी येण्यासाठी लाईट गेल्यानंतर जनरेटरमध्ये डिझेल टाकण्यासाठी भोसे येथे जावे लागते. बहुतांश वेळा हे काम ज्याचा दस्तनोंदणी करायचा आहे, त्यालाच करावे लागत आहे. सुट्यांमध्ये कार्यालये सुरू ठेवण्यात आली. परंतु कनेक्टिव्हिटीअभावी कामकाज बंदच होते. (वार्ताहर)बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे त्यासाठी दिवसभर ताटकळत बसून राहावे लागत आहे. कधी कधी तर दोन-दोन दिवस कनेक्टिव्हिटी मिळत नाही.त्यामुळे हे सुविधेसाठी चाकणला आलेले रजिस्टर कार्यालय हे असुविधेचे कार्यालय म्हणून पुढे येत असल्याचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ दौंडकर व भाजपा तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर यांनी सांगितले.