शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अनधिकृत बांधकामांना मोकळीक, विक्रेत्यांवर हातोडा

By admin | Updated: December 18, 2015 02:30 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवरची अतिक्रमणे दूर करण्याची महापालिकेची कारवाई जोरात सुरू असली, तरी अनधिकृत बांधकामांकडे मात्र दुर्लक्षच करण्यात येत आहे. गेल्या कित्येक

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवरची अतिक्रमणे दूर करण्याची महापालिकेची कारवाई जोरात सुरू असली, तरी अनधिकृत बांधकामांकडे मात्र दुर्लक्षच करण्यात येत आहे. गेल्या कित्येक महिन्यात पालिकेकडून मोठ्या स्वरूपाचे एकही पक्के बांधकाम पाडण्याची कारवाईच झालेली नाही.बांधकाम विभागाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांची माहितीच मिळाली नसल्याचे यासंदर्भात अतिक्रमणविरोधी विभागाकडून सांगण्यात येते. सार्वजनिक मंडळांची पदपथ अडवणारी बांधकामे, राजकारण्यांची संपर्क कार्यालये या वरदहस्त असणाऱ्या बांधकामांबरोबरच काही दुकानदारांनी दुकानासमोर बांधलेल्या पत्र्याच्या शेड्स, मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सनी रस्ता अडवून बांधलेल्या संरक्षक भिंती, परवानगी नसताना मजले चढवलेल्या इमारती अशा प्रकारची अनेक अनधिकृत बांधकामे शहरात आहेत. त्यांच्यामुळेही रस्ता अडवला जात असताना पालिकेची कुऱ्हाड मात्र रस्त्यावरच्या किरकोळ विक्रेत्यांवरच चालवली जात आहे.पालिकेची शहरात १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या प्रत्येक कार्यालयात बांधकाम विभागाचा स्वतंत्र कर्मचारीवर्ग आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात फिरून बांधकाम खात्याची परवानगी नसताना होत असलेल्या बांधकामांची माहिती घेणे, संबंधितांना नोटीस बजावणे, त्यांना दंड करणे, तो वसूल झाला नाही, तर अपुरे असलेले किंवा पूर्ण झाले असेल तर अतिक्रमण विभागाला त्याची माहिती देऊन ते पाडण्यास सांगणे ही जबाबदारी या कर्मचाऱ्यांची आहे. मात्र त्यांच्याकडून ती पार पाडली जात नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत शहरामध्ये अशा प्रकारची अनेक बांधकामे तयार झाली आहेत.रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाडीवाले यांच्याबाबतच्या तक्रारी वाहतूक शाखेकडून सातत्याने होऊ लागल्यावर आयुक्त कुणाल कुमार यांनी अतिक्रमणविरोधी विभागाला कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. पोलीस बंदोबस्त मिळत नाही, असे कारण देत कित्येक महिने हा विभाग सुस्तच होता, आयुक्तांच्या आदेशामुळे गेले दोन आठवडे त्यांच्याकडून कारवाई होत आहे, मात्र ती फक्त टपऱ्या, हातगाड्या उचलून नेण्यापुरतीच मर्यादित आहे. आमच्याप्रमाणेच पालिकेने पक्क्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असे या किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)