शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: April 2, 2015 05:48 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे.

पिंपरी : न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारपासून कारवाई सुरू केली आहे. दिवसभरात पाच बांधकामांवर हातोडा टाकून चार हजार सहाशे सहासष्ट स्क्वेअर फुटांची बांधकामे भूईसपाट केली. तसेच औद्योगिक परिसरातील सात शेड हटविली.पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. एक एप्रिलपासून कारवाई सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.त्यानुसार कारवाई सुरु झाली.महापालिकेने जाहीर केल्यानुसार आज सकाळी दहापासून कारवाई सुरुवात झाली. कारवाईस विरोध होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनाने कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती. त्यामुळे कोणत्या भागात कारवाई होणार, याबाबतची माहिती मुख्य अधिकारी वगळता कोणालाही नव्हती. महापालिकेने प्रभागनिहाय कारवाईचे नियोजन केले होते. कडकोट बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. अ प्रभागातील चिंचवडमधील वाल्हेकरवाडी स्वामी विवेकानंद सोसायटीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणारे पथक दाखल झाले. त्यांनी एका सर्वे नं. ८३ मधील पत्र्यांच्या घरातील नागरिकांना आपले साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. अचानकपणे आलेल्या पथकामुळे येथील नागरिकांची पुरती धांदल उडाली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी घरातील साहित्य बाहेर काढले. त्यानंतर नऊशे स्क्वेअर फुटांचे घर पाडण्यात आले. या वेळी स्वत:च्या डोळ्यांसमोर घर पडताना पाहून येथील मायलेकाला अश्रू अनावर झाले. या कारवाईत तीन जेसीबी, १० कर्मचारी आणि २० पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. सोसायटीत कारवाई सुरू झाल्याची माहिती परिसरात पोहोचताच कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक घरी परतले. दुपारनंतर पथक दुसरीकडे रवाना झाले. त्यानंतर ब प्रभागातील थेरगावमधील १२११ स्क्वेअर फुटांच्या बांधकामावर कारवाई केली. क प्रभागातील भोसरीतील फुलेनगर जवळच्या एमआयडीसीतील सेटमॅक मॅस्टॉनिक, वेलमेड लॉकींग सिस्टीम, हेमांग आॅटो पार्ट, सागा पॉलिटेक, नीता इंजिनियर्स, जैन फार्मा इंटरनॅशनल या शॉपवर कारवाई केली. ई प्रभागाकडून चऱ्होलीमध्ये सुमारे ८८५ स्क्वेअर फुटांच्या दोन बांधकामे भूईसपाट केली. फ प्रभागात रुपीनगर, संभाजीनगर येथे सुमारे १६५० स्क्वेअर फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.(प्रतिनिधी)