शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरला नगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:52 IST

कारवाईविरोधात नागरिकांनी दाखल केला होता न्यायालयात दावा

जुन्नर : जुन्नर नगरपालिकेच्या वतीने कल्याणपेठ बोचरेआळी परिसरात शहरविकास आराखड्यानुसार रुंदीकरण करण्यात येत असलेल्या रस्त्यामध्ये येत असलेल्या संरक्षक भिंतीची अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढून टाकली.याबाबत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण काढून टाकण्याच्या आदेशाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने या करवाईबाबत नागरिकांत उत्सुकता होती. जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणपेठेत, शहराच्या रस्ते विकास प्रक्रियेत अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत रवींद्र चौधरी आणि सुषमा वाळिंबे यांना नगरपालिकेने यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या.त्यांनी बंगल्याचे बांधकाम करताना संरक्षक भिंत रस्त्यावर अतिक्रमण करून बांधली होती. रस्त्याचे ९ मीटरचे रुंदीकरण करण्याचे नगरपालिकेचे नियोजन होते. तर विकास आराखड्यात बांधकाम करतेवेळी ६ मीटरचा रस्ता असल्याचे संबंधितांचे म्हणणे होते.मुख्याधिकारी डॉ. काटकर यांच्यासह नगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख व्ही. एन. देशमुख, नगरसेवक भाऊ कुंभार, जुन्नरचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे, विनय खत्री, हरी गायकवाड, अरुण मंचरकर तसेच अतिक्रमण विभाग पथक या वेळी उपस्थित होते.याप्रकरणी मात्र संबंधितांनी अतिक्रमण काढून टाकण्याऐवजी नगरपालिकेच्या विरोधात जुन्नर न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना काही दिवसांचा स्थगिती आदेश दिला होता. त्यानंतर नगरपालिकेने कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयाने त्यांना पुन्हा जुन्नर न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. मात्र शहर विकासाच्या प्रक्रियेत कोणाही नागरिकाला अडथळा करता येत नाही. शहर विकासाच्या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील तरतुदींचा आधार घेऊन कायदेशीर प्रक्रियेने पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे जेसीबी लावून काढण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणJunnarजुन्नर