शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

निम्म्या अंगणवाड्यांना हक्काचे छतच नाही

By admin | Updated: February 24, 2015 23:15 IST

नवीन वर्षात जिल्ह्यातील आंणगवाड्यांचा कायापालट करून त्या आनंदवाड्या करण्याचा ध्यास जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील जवळपास निम्म्या अंगणवाड्यांना

बापू बैैलकर, पुणेनवीन वर्षात जिल्ह्यातील आंणगवाड्यांचा कायापालट करून त्या आनंदवाड्या करण्याचा ध्यास जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील जवळपास निम्म्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. ४५७0 पैकी २३३४ अंगणवाड्यांना इमारत आहे, तर २२३९ ठिकाणी इमारत नाही.इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्यांचे ‘रूप’ बदलण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. मुलांना युनिफॉर्म, आयकार्ड, शूज, सॉक्स, बसण्यासाठी बेबी चेअर देण्यात येत आहेत. काही शाळांमध्ये लोकसहभागातून टीव्ही व डीव्हीडी दिले आहेत.मात्र, २२३९ अंगणवाड्या इमारतीविना आहेत. येथील शाळा या समाजमंदिर, खासगी शाळा, मंदिर, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व इतर ठिकाणी भरत आहेत. ८४ अंगणवाड्यांना जागाच उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. २0१0 पासून आतापर्यंत अंगणवाड्यांसाठी ४७६९.९३ लाख इतका निधी मिळाला आहे. त्यातील ४३४९.९३ लाख इतका निधी खर्च झाला असून ९२६ इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत. ३८७ इमारतींची कामे प्रगतिपथावर असल्याचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य अधिकारी मुंढे यांनी सांगितले. अंगणवाड्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३९0२ लाख, १३ व्या वित्त आयोगातून ३७५ लाख, तर आदिवासी उपयोजनांतर्गत ४९२.९३ लाख असा ४७६९.९३ लाख इतका निधी मिळाला आहे. यातून १३१३ इमारतींचे उद्दिष्टांपैकी ९२६ इमारती पूर्ण झाल्या, तर ३८७ इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत. २0१४-१५ मधील जिल्हा वार्षिक नियोजनातून ४२0 लाख इतका निधी मंजूर असून, यातून २२५ इमारतींचे उद्दिष्ट आहे. मात्र अद्याप एकही इमारत पूर्ण झाली नाही. सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले. २0१५-१६ साठी १६५0 लाखांची मागणी जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आली आहे.महिला बालकल्याणच्या सभापती वंदना धुमाळ यांनी , लोकसहभागातून अंगणवाड्यांचे रूप बदलण्याचा प्रयत्न असून जास्तीत जास्त इमारती पूर्ण करण्याचा आमचा प्र्रयत्न असल्याचे सांगितले.