शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्त जिल्हा यंदा तरी अशक्यच

By admin | Updated: March 3, 2015 22:56 IST

जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे.

बापू बैलकर ल्ल पुणेनिर्मलग्राम मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेने ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील उर्वरित गावे हगणदरीमुक्त करण्याचा ध्यास घेतला असला, तरी जानेवारीअखेरपर्यंत सुमारे १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ‘हगणदरीमुक्त जिल्हा’ मोहीम यावर्षी तरी कागदावरच राहणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ आदींनी मार्च २०१५ अखेर तालुके निर्मलग्राम करण्याची शपथ घेतली होती. उर्वरित १ लाख ३६ हजार ७२८ कुटुंबांना शौचालये बांधून देऊन जिल्हा १00 टक्के हगणदरीमुक्त करण्याचा मानस आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला एक पालक अधिकारीही नेमला. मात्र जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, हे उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड असल्याचे चित्र आहे. यातील अडचणी वरिष्ठ पातळीवर सोडविल्या जाणे आवश्यक असताना, त्याकडे डोळेझाक करून फक्त उद्दिष्ट पूर्ण करण्याचा तगादा लावला जात असल्याचे तालुकास्तरावरून सांगितले जात आहे.१,३६,७२८ कुटुंबांपैकी जानेवारीअखेर १७,२८९ कुटुंबांनी शौचालये बांधली. अद्याप १ लाख १९ हजार ४३९ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. हा अनुशेष मोठा आहे. पंचायत समिती, सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्यावर असलेली ही जबाबदारी ते मार्चअखेर किती पार पडतात याकडे लक्ष लागले आहे.४शासनाने दिलेले उद्दिष्ट मात्र सुमारे ८0 टक्के पूर्ण झाले आहे. अजून एक महिना असून, उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल साकोरे यांनी व्यक्त केला. शासनाने २४,७८५ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १७,२८९ शौचालये बांधली आहेत. २२८ गावे निर्मलग्राम पुरस्कार करावयाची होती, त्यातील ३0 गावे निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त झाली आहेत. विभक्त कुटुंबांमुळे आकडा वाढला४भोर तालुक्यात फक्त ३८७ कुटुंबांकडे शौचालये बांधणे बाकी आहे असे पंचायत समितीतून सांगण्यात आले; मात्र जिल्हा परिषदेतून घेतलेल्या आकडेवारीवरून तेथे जानेवारी अखेरपर्यंत २३६५ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत पालक अधिकारी नितीन माने यांना विचारले असता, निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त गावांव्यतिरिक्त गावांतील काम हाती घेतले होते. यातील फक्त ३८७ कुटुंबे शिल्लक आहेत. विभक्त कुटुंबांमुळे हा आकडा जास्त दिसत आहे. खेडमध्ये १३ हजार ३७५ कामे बाकी४खेड तालुक्यात ६६४१ कुटुंबांकडे शौचालये नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासन सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात तिथे १३ हजार ३७५ शौचालयांची कामे बाकी आहेत. फेबु्रवारीत १६४ कामे पूर्ण झाली आहेत. अजून काही गावांचा अहवाल पंचायत समितीला दाखल झाला नसल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य पवार यांनी सांगितले. जानेवारी २0१५ अखेरपर्यंत जिल्ह्यातील निर्मलग्रामची स्थितीतालुका कुटुंबे किती बांधली शिल्लकआंबेगाव ४३६८४ १८९८ ५0७२बारामती ५४७६४ १00२ ९४४२भोर ३१८२४ १९२१ २३६५दौंड ४९0९९ १२१८ १४७२३जुन्नर ६६७३८ ८१७ ८१९३खेड ६0७१८ १४३५ ६६४१मावळ ३९६९२ ८७३ १0३४२मुळशी २७६५५ २५0९ ४४४पुरंदर ३४0७२ ११८८ ७६६६शिरूर ५५५२६ १७0३ १३१६३वेल्हे १११९९ ४६३ १४८३एकूण ६३९१६९ १७२८९ ११९४३९