शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील समाजमंदिरे होणार ज्ञानमंदिरे

By admin | Updated: April 11, 2016 00:39 IST

समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समाजमंदिरात काय चालते? असे जर एखाद्या गावात जाऊन पाहिले तर ते रिकामटेकड्यांचा जुगाराचा अड्डा झाल्याचे चित्र आहे

पुणे : समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समाजमंदिरात काय चालते? असे जर एखाद्या गावात जाऊन पाहिले तर ते रिकामटेकड्यांचा जुगाराचा अड्डा झाल्याचे चित्र आहे. तसेच एका एका गावात अनेक देवांच्या नावांनी ही समाजमंदिरे उभारली गेली; पण त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्राम अभ्यासिकेच्या निमित्ताने हे चित्र बदलणार असून, ही मंदिरे आता ज्ञानमंदिरे होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र दिला. हा मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ही अभ्यासिका शाहू, फुले व आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. खेडोपाड्यातील मुलं शिकली, मोठी झाली तर हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असू शकते, म्हणून पहिल्या टप्प्यात ७५ ग्राम अभ्यासिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक याप्रमाणे या अभ्यासिका होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. यासाठी चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात १0 कोटी प्रस्तावित केले असून, मूळ अंदाजपत्रकामध्ये २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत किमान पहिल्या टप्प्यात १ हजार पुस्तकं ठेवली जाणार असून, तिच्या देखभालीसाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. त्याचे मानधन ग्रामपंचायत देईल. (प्रतिनिधी)थोर पुरुषांचे स्मरण फक्त जयंतीनिमित्तच न करता त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहावी, सातत्याने त्यांचे विचार समाजात रुजावेत यासाठी या अभ्यासिका करीत आहोत.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद