लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती: बारामती तालुका पोलिसांनी गुटखाविक्रेत्यांवर मोठी कारवाई करीत
गुटखामाफियांना हादरा दिला आहे. बारामती औद्योगिक वसाहत परिसरात बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचत गुटखा आणि वाहनासह ८ लाख ९८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला बातमीदारा मार्फत परीसरातील गुटखाविक्रीबाबत माहिती गोपनीय माहिती मिळाली होती. बारामती औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या परिसरात एका पिकअप जीपमधून अनोळखी इसम गुटखा व पानमसाला विक्रीसाठी घेऊन येणार असल्याच्या माहितीचा यामध्ये समावेश होता. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या पिक
अप जीपमधील पाच गोणीमध्ये १ लाख ९८ हजार रुपये किमतीचा विमल पानमसाला गुटख्याचे ७ लाख रुपये किमतीचे १ हजार पुडे, तसेच एक महिंद्रा कंपनीची जीप असा एकूण ८ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ज्ञानदेव ग्यानबा बंडगर (वय २१ ,रा मशिन घरकुल एमआयडी, अक्कलकोट रोड, सोलापूर) याला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश
लंगुटे, पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे, राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
फोटोओळी: बारामती तालुका पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने गुटखाविक्रेत्यावर केलेली कारवाई
०८०३२०२१ बारामती ०३