शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांच्या निवडीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

लोकमत न्यून नेटवर्क पुणे : गावकारभाऱ्यांच्या निवडणुकांसाठी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा उद्या बुधवारी सांयकाळी ५ वाजता ...

लोकमत न्यून नेटवर्क

पुणे : गावकारभाऱ्यांच्या निवडणुकांसाठी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा उद्या बुधवारी सांयकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. शुक्रवारी मतदान होणार असून मतदानाची सर्व तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आज गावा गावातून संचलन करत निवडणुक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात ६५० ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ लारखेला हाेणार आहे. या निवडणुकीत २ हजार ३१ प्रभागासाठी जवळपास ११ हजार ७ उमेदवार रिंगणार आहेत. ४ जानेवारी रोजी ८१ ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध झाल्याने ७४६ पैकी ६५० ग्रामपंचयातीसाठी निवडणुका लागल्या होत्या. ४ तारखेनंतर प्रत्यक्ष प्रचाराला उमेदवारांनी सुरूवात केली. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ ९ दिवस मिळाले. या निवडणुकीत अनेक भावकी एकमेकांच्या विरोधात निवडणुक रिंगणात उभे आहेत. प्रत्येक उमेदवाराने मतदारा पर्यंत पोहचण्यासाठी या दिवसांत जिवाचे राण केले.

उमेदवाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन, रॅली, सभा, कोपरा सभा, जाहिर सभा घेत मतदाराला साद घालण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. गावाबाहेर असलेल्या मतदारांनाही प्रत्यक्ष संपर्क मतदानाच्या दिवशी गावात येत गावाच्या विकासाठी मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. एरवी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान दिसणारा हायटेक प्रचार यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळाला. उमेदवारांनी फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्अॅप सोबतच ट्टीटरचाही वापर प्रचारासाठी केला. गावातील अनेक ग्रुपच्या माध्यमातून प्रचार करत आपली केलेली विकास कामे तर गावाच्या विकासाचा मास्टर प्लॅन दाखवत निवडणुकीत आपल्यालाच मतदान करण्यासाठी साद घातली.

उमेदवारांनी प्रचारात जिवाचे रान केले असले तरी त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा मतदार राजावर काय परिणाम होतो हे १८ तारखेला मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे.