शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गुढीपाडव्याच्या खरेदीला पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये गर्दीच गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:01 IST

मार्केटयार्डमधली प्रचंड गर्दी बघून प्रशासनही झाले हतबल

ठळक मुद्देबाजार समिती प्रशासनाने प्रतिबंधात्मक निर्णय घेणे गरजेचे

पुणे: दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊन  नंतर पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आज सकाळी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्स विसरून मालाची खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडालेली बघायला मिळाली.

पुणे शहर आणि जिल्हामध्ये सध्या देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नागरिक आणि व्यापारी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. मार्केटयार्ड मधली गर्दी प्रचंड बघून प्रशासनही हतबल झालेले दिसून आले. पुणे शहरातच नाही तर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे.  

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डमध्ये माल विक्रीस येत असतात. त्याच वेळी शहरातील व्यापारी लहान मोठे विक्रेते आणि व्यापारी खरेदीसाठी जात असतात.  त्यांच्याकडून नागरिक भाज्या, फळे, फुलं खरेदी करतात. त्यामुळे कोरोना प्रसार अधिक वाढण्याची सुद्धा भीती आहे. मात्र तरीही मास्क तोंड आणि नाकावरून घसरलेले, फिजिकल डिसन्स नाही, सॅनिटायझरचा अत्यल्प वापर इथे दिसून आला.

त्यातच उद्या गुढीपाडवा असल्याने ताज्या भाज्या, फळे आणि फुलांना मागणी असणार आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर बाजारात मोठी लगबग दिसून आली आणि त्याचाच परिणाम म्हणजे झालेली ही गर्दी.  आता तरी बाजार समिती प्रशासन शहाणे होऊन काही प्रतिबंधात्मक निर्णय घेणार का हेच बघावे लागणार आहे. किमान एका गाळ्यावर ठराविक ग्राहकसंख्येचे बंधन, मास्क लावणे आवश्यक, आतमध्ये ठराविक संख्येत प्रवेश अशा नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ठिकाणी झालेली गर्दी ही कोरोना वाढीस कारणीभूत ठरू शकेल यात शंका नाही.

टॅग्स :PuneपुणेMarketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या