शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी खडसावले अधिकाऱ्यांना

By admin | Updated: March 21, 2016 00:29 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सहाय समितीच्या बैठकीला चार वर्षांनी मुहूर्त लागला. ‘एसआरए’ प्रशासनाला केवळ टीडीआरमध्ये रस आहे.

पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सहाय समितीच्या बैठकीला चार वर्षांनी मुहूर्त लागला. ‘एसआरए’ प्रशासनाला केवळ टीडीआरमध्ये रस आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याची आगपाखड पुणे व पिंपरी-चिंचवडच्या आमदारांनी केली. त्यांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. त्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने २००५मध्ये प्राधिकरणाची स्थापना केली. प्राधिकरणासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहाय समिती स्थापन केली. मात्र, तब्बल चार वर्षे होत आली असताना या समितीची बैठक झालीच नाही.गिरीश बापट यांच्या पुढाकारातून समितीच्या बैठकीला आजचा मुहूर्त लागला. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, विजय काळे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी महापालिकेचे सहायक आयुक्त मिनिनाथ दंडवते आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वच आमदारांनी एसआरएच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. प्राधिकरणाच्या नियमावलीस मान्यता देताना चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये (एफएसआय) केलेली कपात, राज्य सरकार व पालिकांच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्प, प्राधिकरणाच्या ताब्यातील रखडलेल्या सदनिकांचा निर्णय आदींविषयीचा ऊहापोह बैठकीत झाला. ‘एसआरएचा बेकायदेशीर कारभार सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे, पात्रतेसाठी गोरगरिबांची पिळवणूक सुरू आहे,’ असा संताप आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी विकसकाकडून एकही प्रस्ताव एसआरए प्रकल्पासाठी का आला नाही, असा सवाल त्यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना केला. मात्र, त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. (प्रतिनिधी)