शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक विभागावर पालकमंत्री नाराज

By admin | Updated: February 8, 2016 02:19 IST

शहरामध्ये हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी पालकमंत्री म्हणून माझ्याशी वाहतूक पोलिसांनी कोणतीही चर्चा केली नाही.

पुणे : शहरामध्ये हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी पालकमंत्री म्हणून माझ्याशी वाहतूक पोलिसांनी कोणतीही चर्चा केली नाही. हेल्मेटसक्ती करण्यापूर्वी दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याची बातमी वाचायला मिळाली असती तर आनंद झाला असता, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. कोणतीही चर्चा न करता हेल्मेटसक्ती लागू केल्यामुळे सरकारची चेष्टा झाली, असे खासदार अनिल शिरोळे म्हणाले. शहरामध्ये गेल्या ३ दिवसांपासून हेल्मेटसक्ती लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार नीलम गोऱ्हे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, लक्ष्मण जगताप, पोलीस आयुक्त के. के. पाठक, पोलीस अधीक्षक जय जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, राष्ट्रवादी काँगेस प्रवक्ते अंकुश काकडे, हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, नगरसेविका रूपाली पाटील, बाळासाहेब रूणवाल, संदीप खर्डेकर, विवेक वेलणकर, शैलेश गुजर, प्रदीप निफाडकर, शिवा मंत्री उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘हेल्मेटसक्तीचा विषय जुना असून तो व्यवस्थित सोडविला पाहिजे. हेल्मेटला विरोध नाही, मात्र त्याबाबत प्रश्न आहेत. पुण्यात आम्ही मोठे रस्ते करू शकलो नाही. महामार्गांवर दुचाकी चालविताना हेल्मेट घातलेच पाहिजे. सक्ती करण्यापूर्वी प्रबोधन केले पाहिजे.’’