शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतुकीसाठी बससंख्येत वाढ

By admin | Updated: June 16, 2015 00:17 IST

विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) यंदा खास विद्यार्थ्यांसाठी बसेसमध्ये वाढ केली आहे.

पिंपरी : विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) यंदा खास विद्यार्थ्यांसाठी बसेसमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक मोठ्या शाळा आहेत. या शाळांतील अनेक विद्यार्थी ये-जा करण्यासाठी पीएमपीच्या बसला पसंती देतात. पीएमपीमार्फत खास विद्यार्थ्यांसाठी बस सोडल्या जातात. मात्र, बसेसच्या फेऱ्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना इतरांबरोबरच गर्दीतून वाट काढत बसने प्रवास करावा लागतो. या गर्दीत अनेकदा विद्यार्थ्यांचे हाल होतात. धोका पत्करून दरवाजाला लटकत प्रवास करतानाही विद्यार्थी दिसतात. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी पीएमपीने येत्या शैक्षणिक वर्षात जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दररोज काही मार्गांवर आठ जादा बस म्हणजे १६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी खास विद्यार्थ्यांसाठी ४० बस सोडल्या जात होत्या. त्यामध्ये आता आणखी आठ बसेसची भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागणार नाही. तसेच वेळेवर बस उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे म्हणाले, साधारणपणे टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, कर्वे रस्ता आणि अन्य काही मार्गांवर सकाळी व सायंकाळी बसस्थानकांवर विद्यार्थ्यांची गर्दी होते.पीएमपीमार्फत खास विद्यार्थ्यांसाठी जादा बस सोडल्या जातात. मात्र, मागील वर्षीपर्यंत ही संख्या अपुरी होती. या वर्षी या बसेसमध्ये वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)