शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल घडविणारी लिंबाची तालीम

By admin | Updated: December 11, 2015 00:45 IST

नढे-तापकीर, हरिजन वस्ती व लिंबाजी तालीम या तीन तालमी पूर्वी रहाटणी गावात होत्या. त्यापैकी दोन तालमी बंद झाल्या. लिंबाची तालीम ही एकच तालीम सुरू आहे

नढे-तापकीर, हरिजन वस्ती व लिंबाजी तालीम या तीन तालमी पूर्वी रहाटणी गावात होत्या. त्यापैकी दोन तालमी बंद झाल्या. लिंबाची तालीम ही एकच तालीम सुरू आहे. रहाटणी गावच्या स्थापनेपासून असलेली ही जुनी तालीम आहे. १० वर्षांपूर्वी महापालिकेने या तालमीसाठी इमारत बांधून दिली आहे. या तालमीत वस्ताद बाजीराव नेवाळे यांनी अनेक मल्ल घडविले. पंचक्रोशीत या तालमीची ख्याती आहे. एकनाथ नखाते, भगवान नखाते, मोरू नखाते, सीताराम नढे, धोंडिबा कोकणे, शिवराम कदम, तुळशीराम नखाते असे अनेक मल्ल या तालमीत तयार झाले. अनेक स्थानिक मैदानी कुस्त्यांमध्ये त्यांनी नावलौकिक मिळविला. यानंतरच्या पिढीत विलास नखाते, विजय नखाते, श्रीराम कोकणे हे मल्ल घडले. श्रीराम कोकणे हे १९५६ ते १९६० या कालावधीत सतत चार वर्षे आॅल इंडिया विद्यापीठ चॅम्पियन होते. त्यांनी चार वर्षे विद्यापीठाचे नेतृत्व केले. तेव्हा त्यांनी चारही वर्षे सलग विद्यापीठाला चॅम्पियनशिप मिळवून दिली. या तालमीत सराव करणाऱ्या किशोर नखाते, संतोष नखाते, उमेश तांबे, निखिल नखाते, नीलेश नखाते या मल्लांनी विविध कुस्ती सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकणे हे पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते. १९८७ ते २०१३ या त्यांच्या अध्यक्षतेच्या कालावधीत त्यांनी शहरात कुस्तीचा प्रचार व प्रसार केला. या दरम्यान त्यांनी शहरातील अनेक मल्ल राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये चमकविले. या संघामार्फत २००४-०५मध्ये नितीन बारणे यांची जर्मनी येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती. त्याबद्दल बारणे यांना महापालिकेने १५ हजार रोख देऊन सन्मानित केले होते. ‘सध्याच्या काळातील तरुणांनी तालमीकडे पाठ फिरविली आहे. अनेक तरुण तर व्यायामही करीत नाहीत. व्यायाम करणाऱ्यांमध्ये जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जीमच्या व्यायामाने शरीरयष्टी पीळदार बनविता येते. परंतु, जीम बंद केल्यानंतर शरीरयष्टी पूर्वस्थितीत येते. तालमीत व्यायाम करून कमावलेली तब्येत मात्र कधीच कमी होत नाही. तालमीकडे तरुणांनी पाठ फिरविल्याने कुस्त्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे,’ असे तालमीचे मार्गदर्शक श्रीराम कोकणे यांनी सांगितले. सध्या ते या तालमीची संपूर्ण देखभाल व व्यवस्था पाहतात.