शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाला विविध संस्था, संघटनांतर्फे अभिवादन

By admin | Updated: December 7, 2015 00:20 IST

शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विविध कार्यक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.

पुणे : शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विविध कार्यक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहकारनगर भागातील विविध समाजांतील बांधवांनी एकत्र येऊन पूर्वसंध्येला कॅँडल मार्च काढून अभिवादन केले आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. या वेळी समीर गवळी, महेश शिंदे, अमोल लोंढे, भारत जावळे, शेखर चव्हाण आदी उपस्थित होते.पुणे शहर काँग्रेस मानवाधिकार विभागाचे अध्यक्ष रामदास मारणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी रमेश अय्यर, राहुल जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश सातपुते यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, मुकेश धिवार, अमर परदेशी, उत्तम भूमकर, पोपट पाटोळे आदी उपस्थित होते.शिवसेना पुणे शहराच्या वतीने स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी शहर संघटक अजय भोसले, संजय मोरे, उपशहर प्रमुख विशाल धनवडे, विभाग संघटक उत्तम भुजबळ, विभाग प्रमुख सुनील धोत्रे, डॉ. अमोल देवळेकर आदी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने भा.ज.पा पुणे शहरचे अध्यक्ष अनिल शिरोळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी शहराचे संदीप खर्डेकर, सरचिटणीस दीपक शिंदे, भीमराव साठे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश जौजांळ, बिपिन घोरपडे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.भारिप बहुजन महासंघाच्या युवक आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग २४ तास आंबेडकरी गीतांचा व विचारांचा जागर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी एक वही, एक पेन हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अ‍ॅड. वैशाली चांदणे व भारिपचे युवक शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माधवी गोसावी, सुनीता डांगे, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होत्या.राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. उज्ज्वला हाके यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संगीता जोगदंड, सरोजिनी गलजिन, सुभद्रा धायगुडे, विनायक रुपनवर, संतोष भुस्कुटे आदी उपस्थित होते.फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने हाजी नदाफ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ या अभियानाअंतर्गत डॉ. आंबेडकर लिखित गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महाग्रंथ युवा उद्योजक डॉ. सोहम देशपांडे यांच्या हस्ते सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सरदार तेजपालसिंह, योगेश पिंगळे, डॉ. योगिता तिवारी आदी उपस्थित होते.मातोश्री रमाबाई आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच १०० महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांनी शपथ घेतली की, महिलांवर जो अन्याय-अत्याचार होत आहे तो आम्ही येथून पुढे होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. या वेळी छाया जाधव, नंदा सरोदे, रेखा चव्हाण, सुरेखा अडसुळे, अनिता घोरपडे, सीमा शिंदे, दीपाली जाधव उपस्थित होत्या.दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यान येथे शाखा पुणे जिल्हा अध्यक्ष पंडित जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच सामुदायिक भीमस्मरण, भीमस्तुती, बावीस धम्म प्रतिज्ञा ग्रहण, भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती व सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी समता सैनिक दलाचे मेजर अर्जुन कांबळे, अंबादास कांबळे, भालचंद्र चौरे, शांताराम गायकवाड आदी उपस्थित होते.रिपब्लिकन बांधकाम कामगार सेनेच्या वतीने संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर शिरसट यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान जुनी जिल्हाधिकारी कचेरी येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी भगवान गायकवाड, विनोद चव्हाण, जगन्नाथ गायकवाड आदी उपस्थित होते. ओबीसी एनटी पार्टी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या अध्यक्षा राधिका मखामले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या वेळी सीमा पवार, सुभद्रा धमगुडे, कल्पना पांगसे, सुचेता आबनावे, रंजना सांवत आदी उपस्थित होते.भारतीय कामगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्योती परिहार यांनी पुष्पहार अर्पण केले. १० ते १५ कामगारांनी १०० मेणबत्त्या पेटवून अभिवादन केले. या वेळी प्रा. शशिकांत पाटील, राजेंद्र राऊत, अशोक पवार, सुरेश तोडलकर, नवनाथ भिसे आदी उपस्थित होते.सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.पुणे कॅन्टोमेंन्टचे वॉर्ड क्र.३ चे नगरसेवक दिलीप गिरमकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच गिरमकर यांच्या हस्ते युनिटी फॉर फ्रिडम फाउंडेशनचे अध्यक्ष भगवान वायाळ यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवत्ता कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाचे विश्वस्त आतिष कुऱ्हाडे, अध्यक्ष सचिन भोपे, भाजपा वॉर्ड हिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपक कुऱ्हाडे, गणेश भोज आदी उपस्थित होते.युवा दलित पँथर संघटनेच्या वतीने संघटनेचे उपाध्यक्ष जालिंदर वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी दिलीप हारकुडे, राजेश हरवाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्त्री आधार केंद्राच्या वतीने केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सल्लागार शेलार गुरुजी, कार्यकर्त्या सरोज पाईकराव, अनिता फडतरे, शंकुतला जाधव आदी उपस्थित होते.झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुधीर नेटके, सुरेखा भालेराव, संतोष बोतालजी, वामन कदम आदी उपस्थित होते.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, उपप्राचार्य प्रा.शामकांत देशमुख, उपप्राचार्य प्रा. शरद चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भीमगीते, अभिवादन व उद्देशिकेचे वाचनपुणे : रिपब्लिकन जन-शक्ती यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या हस्ते पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी आबा सावंत, आशुतोष भोसले, आश्विनी दुपारगुडे, मुकुंद चव्हाण, अमित सपकाळ आदी उपस्थित होते.राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपाध्यक्ष आनंद सवाणे व प्रा. मयूर गायकवाड यांच्या हस्ते पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या वेळी सोनू काळे, संदीप थोरात, हर्षद शेख, सतिन पारधे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेस यांच्या वतीने अध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या हस्ते पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नरेश साळुंके, अ‍ॅड. अशोक भोसले, प्रताप सोलंकी, नंदू करोते, प्रकाश कंडारे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन संघर्ष दल यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक संजय भिमाले यांच्या हस्ते स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष नितीन बालकी, सरचिटणीस विनायक बंडी, संघटक नीलेश मडूर, विशाल अंदे आदी उपस्थित होते. फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटना, शिवशक्ती विचार मंच व लहू गर्जना ग्रुप यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी फुले- साठे-आंबेडकर विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन सोनवणे, राजेश व्यास, प्रकाश शहा उपस्थित होते.