दोन्ही महिला बचत गटमागील तीन वर्षांपासून शहरात विविध सामाजिक कार्य चांगले पार पाडत असून ३ जानेवारी २०१८ साली या महिला बचत गटाची स्थापना करून, मागील तीन वर्षांत शेकडो महिलांना या बचत गटांनी रोजगार देवून, महिलांना सक्षम केले आहे, असे प्रतिपादन महिला विकास महामंडळ पुणे यांचे क्षेत्रीय समन्वयक विजय चितारे यांनी केले.
यावेळी निसर्ग वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा जाकिया बागवान, उपाध्यक्षा वैशाली कुलथे, खजिनदार कोमल मोहिते व अंबिका स्वयंसहायता महिला बचतगटाचा अध्यक्षा उषाताई जगताप, सचिव नीलम कळसाईत व अनेक बचत गटांच्या महिला कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना बचत गटांच्या महिला.