शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2015 00:12 IST

‘जगाला समतेचा मार्ग दाखविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त न होता अनुयायी व्हा,’ असे आवाहन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे

इंदापुरात अभिवादनइंदापूर : ‘जगाला समतेचा मार्ग दाखविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त न होता अनुयायी व्हा,’ असे आवाहन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. रत्नाकर मखरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाबाबत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मुख्याध्यापक साहेबराव पवार, सुनील मिसाळ, सविता गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले. आंबेडकर महापरिनिर्वाण दिननारायणगाव : विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जुन्नर तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आज जुन्नर येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी गणेश वाव्हळ, राजेंद्र रणदिवे, सचिव विलास कडलाक, पंकज खरात, रवींद्र मोरे, बाळासाहेब दहिफळे आदी उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील विविध संघटना व संस्थांच्या तसेच बौद्ध समाजबांधवांच्या वतीने या महामानवाला अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आज सकाळी जुन्नर येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सामूहिक बुद्धवंदना, त्रिशरण व पंचशील घेण्यात आले तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.सासवड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुरंदर तालुका बौद्धजन विकास संघटनेच्या वतीने पुतळ्यास सी. एम. यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आनंदराव घोरपडे, रमाकांत कांबळे, प्रा. गौतम बेंगळे, पल्लवी भोसले, सुहास बेंगळे, राजाराम बेंगळे, रामचंद्र कांबळे, सीताराम जगताप, पांडुरंग पाटील, प्रा. केशव काकडे, नंदकुमार दिवसे, वामन गायकवाड, महापरिवर्तन ट्रस्टचे प्रकाश धिवार, शकुंतला सोनावणे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सासवड नगर परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नगरसेवक अजित जगताप, यशवंत भांडवलकर, नगरसेविका मीना वढणे, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. शिरूर येथे बाबासाहेबांना अभिवादनशिरूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे सर्वांना जगण्याचा समान अधिकार मिळाला. त्यांच्यामुळे मी नगराध्यक्षा होऊ शकले, असे गौरवोद्गार नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी काढले. नगर परिषदेच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. गावडेंसह नगरसेवक व शिक्षण मंडळ सदस्य या वेळी उपस्थित होते. विविध संस्था- संघटनांच्या वतीनेही अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा गावडे यांच्यासह माजी उज्ज्वला बरमेचा, रवींद्र ढोबळे, अशोक पवार, आबिद शेख, सुवर्णा लोळगे, प्रा. प्रभुलिंग वळसंगे, नीलेश खाबिया, राजेंद्र जाधवराव, संतोष शितोळे, सदस्य तुकाराम खोले, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, अभियंता कुंभार यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. फुले, आंबेडकर संयुक्त जयंती समितीच्या वतीने पुतळ्याजवळ अभिवादन सभा घेण्यात आली.४ नगराध्यक्षा गावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सभेला हजेरी लावली. माया गायकवाड, रमेश गायकवाड, बबन गायकवाड, मुकुंद नगराळे, समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद गायकवाड, बाफसेफचे डॉ. मगन ससाणे, बीएसपीचे अनिल गायकवाड, शहर राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष नीलेश पवार, संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष विनोद भालेराव, पांडुरंग बनसोडे, अनिल बांडे, शरद गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या वेळी उपस्थित होते.