शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वारगेट-कात्रज’ मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

पुणे : दक्षिण पुण्यातल्या वाहतूककोंडीवर उपाय ठरणाऱ्या ‘स्वारगेट ते कात्रज’ या भुयारी मेट्रो प्रकल्पाला पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण ...

पुणे : दक्षिण पुण्यातल्या वाहतूककोंडीवर उपाय ठरणाऱ्या ‘स्वारगेट ते कात्रज’ या भुयारी मेट्रो प्रकल्पाला पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता दिली. महामेट्रोकडून या प्रकल्पाचा ३ हजार ६०० कोटींचा आराखडा तयार केलेला आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे विस्तारीकरण कात्रजपर्यंत हा प्रकल्पामुळे होणार आहे.

महामेट्रोने केलेल्या या आराखड्यावर दोन वर्षांपासून एकमत होत नव्हते. हा मार्ग भुयारी असावा की उन्नत असावा, याविषयी मतभेद होते. सर्वसाधारण सभेसमोर आठ महिन्यांपासून असलेल्या या प्रस्तावाला वेळेत मान्यता न मिळाल्याने राज्य व केंद्र शासनाच्या यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद मिळू शकली नाही.

ऑनलाईन पद्धतीने बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रकल्पाचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. चर्चेदरम्यान शिवसेना व कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्याची मागणी केली. शिवसेने गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी, वनाज ते रामवाडी मेट्रोचे काम सुरू असून कोथरूड भागात ही ते सुरू आहे. महामेट्रोकडून अनेकदा अलाईन्मेंट आणि अन्य बदल केले जातात. स्थानकांची जागा बदलली जाते. त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे मेट्रो नेमकी कशी होणार, याची माहिती दिली जावी. त्यानंतरच मान्यता द्यावी अशी भूमिका घेतली. तर, काँग्रेसच्या आबा बागुल यांनी प्रकल्पाचे सादरीकरण व्हावे, अशी मागणी केली.

नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी, पुणेकरांच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प आहे. गेली दोन वर्षे या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही. महापौर, आयुक्त यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण झाले आहे. सर्व गटनेत्यांसमोर सादरीकरण केले जाईल. हा प्रस्ताव आजच मंजूर करण्याची मागणी केली.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला पुढील आठवड्यात प्रकल्पाचे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एकमताने प्रकल्पाला मान्यता दिली.

====

स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव आज सर्वसाधारण सभेत मान्य केला. गेल्या दोन वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प (डीपीआर) महामेट्रोने तयार केलेला आहे. पालिकेने हा डीपीआर मान्य करून राज्य तसेच केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी न पाठविल्याने केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या अंदाजपत्रकात आवश्यक तो निधी मिळाला नाही. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने कत्रजपर्यंत मेट्रो होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- गणेश बिडकर, सभागृह नेता

====

स्वारगेट ते कात्रज मेट्रो

मार्गाची रुंदी ५.४६ किलोमीटर

स्थानके : ३ स्थानके

खर्च : ३ हजार ६०० कोटी

हिस्सा : केंद्र सरकार ५० टक्के, राज्यसरकार ३० टक्के, महापालिका २० टक्के.