शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णाला जीवदान

By admin | Updated: February 2, 2017 04:03 IST

औरंगाबादमधील ४५ वर्षीय व्यक्ती अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाने मंगळवारी (दि. ३१) रात्री १० वाजता

पुणे : औरंगाबादमधील ४५ वर्षीय व्यक्ती अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाने मंगळवारी (दि. ३१) रात्री १० वाजता रुग्णाला ब्रेनडेड घोषित केले. नातेवाइकांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे ग्रीन कॉरिडोरचा वापर करून यकृत तीन तासांत पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला आणण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याने पुण्यातील रुग्णाला जीवदान मिळाले. या वर्षी औरंगाबादमधून पुण्यात यकृत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे पुणे झेडटीसीसीच्या प्रमुख आरती गोखले यांनी सांगितले.याबाबत सांगताना सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. बिपिन विभुते म्हणाले, ‘मंगळवारी रात्री ११ वाजता झेडटीसीसीकडून औरंगाबादमधील व्यक्तीच्या यकृताबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे, रात्री १२ वाजता डॉ. राहुल सक्सेना यांची टीम औरंगाबादला रवाना झाली. पहाटे ५ वाजता ही टीम औरंगाबादला पोचली. त्यानंतर, सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी रुग्णाचे यकृत शस्त्रक्रियेद्वारे शरीरातून काढण्यात आले. बुधवारी सकाळी ९.३० वाजता ग्रीन कॉरिडोरचा वापर करून रुग्णवाहिकेने साधारणपणे ३ तास १० मिनिटांमध्ये ही टीम पुण्यात पोचली. त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलपर्यंतचे १४.५ किमीचे अंतर १७ मिनिटांत पार करत १.०५ मिनिटांनी यकृत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोचवण्यात आले.’ पुण्यातील रुग्णाला रुग्णालयातर्फे एक महिन्यापूर्वी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता. या अवयवदानामुळे पुण्यातील रुग्णाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि त्याला जीवदान मिळाले. (प्रतिनिधी)- रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील ४५ वर्षीय व्यक्तीचा अपघात झाल्याने त्याला सिगमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा रुग्ण ब्रेन डेड झाल्याचे घोषित झाल्यानंतर मंगळवारी रात्री रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदान करण्याची परवानगी दिली. त्यानंतर राज्याच्या झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन सेंटरने (झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीनुसार ब्रेन डेड रुग्णाचे यकृत पुण्याला रवाना केले.