शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार देण्याआधीच साहित्य खरेदीस मान्यता

By admin | Updated: June 10, 2015 05:22 IST

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शालेय साहित्य खरेदीच्या तब्बल ४ कोटींच्या निविदा प्रक्रियेस स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.

पुणे : शिक्षण मंडळास पूर्वीप्रमाणेच आर्थिक, साहित्य खरेदी तसेच इतर अधिकार महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला असतानाच; हा प्रस्ताव पुढे ढकलत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शालेय साहित्य खरेदीच्या तब्बल ४ कोटींच्या निविदा प्रक्रियेस स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. खरेदीवरून शिक्षण मंडळ सदस्य आणि स्थायी समितीमध्ये सुरू असलेल्या खरेदीच्या वादावर पडदा पडला असला, तरी शिक्षण मंडळ सदस्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षण मंडळाचे सर्व प्रकारचे अधिकार काढून ते महापालिका आयुक्तांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने पत्र पाठवून मंडळास पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याच्या सूचना पालिका प्रशासनास केल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीत, महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना, शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात न आल्यानेही या शैक्षणिक वर्षाची खरेदी स्थायी समितीद्वारेच करण्याची भूमिका समितीने घेतली होती. मंडळानेही पुन्हा अधिकार देण्याचा ठराव केला होता. त्यामुळे ३१ मार्च रोजी शैक्षणिक साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतरही गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव रखडला होता. (प्रतिनिधी)यंदाही साहित्य वेळेवर नाहीच मुलांना वेळेत शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून स्थायी समितीच्या ३१ मार्च रोजी झालेल्या पहिल्याच बैठकीत या खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, मंडळ आणि स्थायी समितीमध्ये सुरू असलेल्या आर्थिक वादावरून या खरेदीच्या निविदा रखडल्या होत्या. शाळा सुरू होण्यासाठी अवघा आठवडा उरला असल्याचे सांगत या निविदांना मान्यता देण्यात आली. त्यात गणवेश शिलाईसाठी १ कोटी १८ लाख, वह्या ५६ लाख, चित्रकला साहित्य ४८ लाख, दप्तर खरेदीसाठी १ कोटी ५८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र, हे साहित्य १५ जूनपर्यंत मिळणे अशक्यच असल्याने घाईगडबडीने ही खरेदी केली असली तरी, हे साहित्य मुलांना वेळेवर मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.