शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्याच्या निलंबनाचा ठराव मंजूर

By admin | Updated: April 30, 2017 04:55 IST

वाघोली शाळा क्र. १ चे शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२) यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी शिवारात मंगळवारी (दि. २५) विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला

पुणे : वाघोली शाळा क्र. १ चे शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२) यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी शिवारात मंगळवारी (दि. २५) विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार धरत गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या निलंबनाचा ठराव हवेली पंचायत समितीच्या सदस्यांच्या बैठकीत मंजूर केल्याची माहिती सभापती वैशाली महाडिक यांनी दिली.जीवन वाघमारे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली नंबर १ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक जीवन वाघमारे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या ज्योती परिहार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हवेली तालुका शिक्षक संघाने हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार या तीन महिन्यांपूर्वी वाघोली परिसरातील एका खासगी शाळेच्या तपासणीसाठी गेल्या असता त्या शाळेचे पदाधिकारी व शिक्षकांनी परिहार व त्यांच्यासोबत असलेल्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. वाघमारे यांच्यासह सहा शिक्षकांनी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु, हे सहा शिक्षक घटनास्थळी उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी तक्रार करण्यास नकार दिल्याने त्यांना नोटीस देण्यात आली होती. - ज्योती परिहार यांनाच या मृत्यूसाठी कारणीभूत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. मात्र त्यांनी या प्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.