शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कमी आणेवारीच्या गावात शेतकऱ्यांसाठी अनुदान

By admin | Updated: December 31, 2014 23:25 IST

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामतीसतत ४ वर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे. या ५ तालुक्यांसाठी ५३ कोटी रुपयांची मागणी होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. ही बाब दुष्काळी गावातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे. सन २०१२-१३ मधील खरीप व रब्बी हंगामांतील बाधित शेतकऱ्यांना कृषीपिकांसाठी व फळबागांसाठी अनुदान शासनाकडून उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात एकूण १८४ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये बारामती ६७, शिरूर २८, इंदापूर ३६, दौंड १९, पुरंदर ३४ अशी तालुकानिहाय गावांची आकडेवारी आहे. याच हंगामासाठी पूर्वी ११ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाने एकूण ५३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. २८ कोटी रुपये येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध झालेल्या अनुदानाचे वाटप तालुकानिहाय मंडल कार्यालयांच्या अंतर्गत केले जात आहेत. या संदर्भात माहिती देताना उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले, की उपलब्ध झालेल्या अनुदानाचे तत्काळ वाटप केले जात आहे. आता २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावांच्या संख्येनुसार या अनुदानाचे वितरण तहसील कार्यालयांना करण्यात आले आहे. सर्वाधिक ६७ गावे बारामती तालुक्यातील आहेत. त्यांपैकी ३० गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले, की ९ कोटी ६८ लाख ४६ हजार १० रुपये इतके अनुदान मिळाले आहे. वडगाव निंबाळकर सर्कल अंतर्गत करंजे, देऊळवाडी, कानाडवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, लोणी भापकर मंडलांतर्गत माळवाडी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, जळकेवाडी, ढाकाळे, अंजनगाव, खामगळवाडी, कऱ्हावागज, जळगाव कडेपठार, भिलारवाडी, काऱ्हाटी, मोरगाव मंडलांतर्गत मोढवे, मोरगाव, उंबरवाडी, मुर्टी, मोराळवाडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, बाबुर्डी, शेरेवाडी या गावांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप थेट खात्यावर करण्यात येणार आहे. ४आणेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना यापूर्वी हेक्टरी ३ हजार रुपये अनुदान मिळत होते. आता त्यामध्ये दीड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हेक्टरी साडेचार हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर बागायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १६ हजार रुपये, फळबागांसाठदेखील वेगळ्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. ४शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अनुदान प्राप्त झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. उर्वरित २८ कोटी रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच मिळेल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.