शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी मंत्र्यांची पोरं लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

-- इंदापूर : देशात आणि राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे कुरघोडीच्या राजकारणाचा ज्वर कमी झालेला दिसत ...

--

इंदापूर : देशात आणि राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे कुरघोडीच्या राजकारणाचा ज्वर कमी झालेला दिसत नाही. मात्र, नागरिकांच्या मदतीला धावून येत व आम्ही तुमच्या सोबतच आहोत, याची भावना नागरिकांमध्ये तयार करण्यासाठी राजकारणातील पुढची पिढी थेट लोकांमध्ये उतरून सर्वसामान्यांची कामे करत आहे. त्याचेच चित्र इंदापूर तालुक्यात आज दिसले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेलेे मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी आज गाद्या उचलणे, झाडू मारणे आदी कामे करत कोरोनाच्या लढाईत त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले.

मंत्री भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी आज इंदापुरातील विद्या प्रतिष्ठान संकुलातील कोरोना केअर सेंटरमध्ये गाद्या उचलने, खाटा लावणे आदी कामे करत रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिले, तर दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी बावडा ग्रामीण रुग्णालयात थेट हातात झाडू घेऊन केर काढत स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्याचे घडले असे, इंदापूराच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील सरकारी, खासगी रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत आहेत, त्यामुळे रुग्णांची सोय व्हावी यासाठी मंत्री भरणे यांच्या पुढाकाराने विद्या प्रतिष्ठान संकुलात शंभर बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत आहे. त्यामध्ये शंभर खाटांची सोय करण्यात येत आहे, त्या खाटांची सोय चांगली व्हावी यासाठी भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांनी जातीने लक्ष घातले आहे. आज त्यांनी काही कार्यकर्त्यांना घेऊन स्वत:च गाद्या उचलून विविध खोल्यांमध्ये नेल्या व तेथे खाटा टाकून त्यावर गाद्या ठेवून बेडची व्यवस्था केली. त्यांनी स्वत:च ही कामे केल्यामुळे उपस्थितांमध्ये कामाचा उत्साह वाढला आणि एका दिवसात कोविड केअर सेंटर कमी मनुष्यबळात उभे राहिले.

यावेळी तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ. एकनाथ चंदनशिवे, विद्या प्रतिष्ठाचे सरव्यवस्थापक वर्धमान शहा यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी केली तर राहुल गुंडेकर, ॲड. अक्रम शेख, नागेश धुमाळ, प्रतिक झोळ, विजय आवटे, अजिंक्य बंगाळे , हर्षल देवडे, शक्ती पलंगे या युवकांनी यावेळी श्रम घेतले.

दुसरीकडे रुग्णांची रुग्णालयाअभावी परवड होऊ नये यासाठी बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटनासाठी आज त्यांच्या कन्या अंकिता पाटील रुग्णालयात पोचल्या. मात्र, उद्घाटनापूर्वीच त्यांना रुग्णालयाच्या आवारात केर दिसला. त्यांनी अस्वच्छतेबाबत जाब विचारला, मात्र कोरोनामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाणवा जाणवत असल्याचे समजल्यावर अंकिता यानी स्वत:च हातात झाडून घेऊन झाडन काम करण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी एक खोली स्वच्छ करत उपस्थितांमध्ये स्वच्छतेविषयीची सजगता निर्माण केली.

या वेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती स्वातीताई शेंडे, उपसभापती संजय देहाडे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, सदस्य अमोल घोगरे, ग्रामसेविका पावसे तसेच बावडा आरोग्य केंद्राचे डॉ. घोगरे व इतरांनी रुग्णालयाची स्वच्छता केली.

--

चौकट

मुलांचा आदर्श कार्यकर्त्यांनी घ्यावा

--

हल्ली राजकीय वादातून आणि विचारणसरणीतून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे, सोशल मीडियावर भांडण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. कधीकाळी मित्र असलेल्यांमध्येही केवळ राजकीय मतभेदातील वादामुळे मनभेद निर्माण होत आहेत व ते एकमेकांचे शत्रू बनत आहेत. माझा नेता, पक्ष किती चांगला व तुझा नेता, पक्ष किती वाईट हे सांगताना व एकमेकांच्या गळी उतरविताना, सोशल मीडियावर मिम, पोस्ट, कमेंट तरुण-तरुणींचे महिनोमहिने वाया जात आहेत. मात्र, नेते आणि पक्ष काय करत आहेत हे विसरून सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीची गरज ओळखून थेट ग्राऊंडवर येऊन लोकांना मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. नेमका तोच संदेश आज श्रीराज भरणे आणि अंकिता पाटील यांनी त्यांच्या कृतीतून दाखविला त्याचा आदर्श त्यांच्या कार्यकर्त्यांनी घ्यावा, अशी चर्चा शहरात व तालुक्यात आज सुरू होती.